Sakal-Vidya 
पश्चिम महाराष्ट्र

दहावी परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

सकाळ वृत्तसेवा

‘न्यू एज्युकेशन प्लॅन २०२०’विषयी मिळणार माहिती
सोलापूर - यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून दहावीच्या अभ्यासक्रमाबरोबरच परीक्षा पद्धतीमध्येही अामूलाग्र बदल करण्यात आले आहेत. या बदलांना सामोरे जाताना अभ्यासाचे नियोजन कसे करावे, परीक्षेचे नेमके स्वरूप, याविषयी विद्यार्थी व पालकांना योग्य मार्गदर्शन हवे असते. याच उद्देशाने ‘सकाळ विद्या’ व ‘क्रिएटिव्ह ॲकॅडमी’च्या वतीने पंढरपूर येथे शनिवारी (ता. ७) चर्चासत्राचे आयोजन केले आहे. 

शालेय अभ्यासक्रमात, प्रश्‍नपत्रिका व विषयानुरूप झालेले बदल समजून घेण्यासाठी विद्यार्थी व पालकांसाठी हे चर्चासत्र महत्त्वाचे ठरणार आहे. संपूर्ण अभ्यासक्रम व मूल्यमापन पद्धत विद्यार्थी केंद्रित असल्याने विषयानुरूप योग्य नियोजन व आकलन महत्त्वाचे असणार आहे. बदललेल्या अभ्यासक्रमानुसार प्रश्‍नपत्रिकांचे स्वरूप कसे असणार आहे, त्या अनुषंगाने अभ्यासाचे व वेळेचे नियोजन कसे असावे, परीक्षेला तीनच महिने राहिले असल्याने अभ्यास कसा करावा, परीक्षेचे ओझे न बाळगता परीक्षेला कसे सामोरे जावे, याविषयी समुपदेशन या चर्चासत्रातून केले जाणार आहे. त्याचबरोबर भावी काळातील दहावीचे स्वरूप म्हणजेच ‘न्यू एज्युकेशन प्लॅन २०२०’विषयी पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना पुण्यातील नामांकित वक्‍ते प्रा. एन. ए. शेख मार्गदर्शन करतील.

दहावी हा भावी करिअरचा पाया असल्याने बऱ्याचदा अपुऱ्या माहितीमुळे पालक आपल्या पाल्यासाठी कोणते करिअर योग्य आहे, याबाबत साशंक असतात. दहावीनंतर मेडिकल व इंजिनिअरिंग याव्यतिरिक्त उपलब्ध असणारे करिअरचे पर्याय, विद्यार्थ्यांचा कल पाहून योग्य पर्यायांची निवड कशी करावी, दहावीनंतर होणाऱ्या विविध प्रवेशपरीक्षा, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित शिक्षण संस्था व तेथील प्रवेशाची तयारी कशी करावी, याविषयी सखोल मार्गदर्शन या चर्चासत्रातून मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT