The hail began to grow in the district 
पश्चिम महाराष्ट्र

जिल्ह्यात गारठा वाढू लागला; पारा 20 अंशावर

अजित झळके

सांगली : जिल्ह्यात सलग पंधरा दिवस अतिवृष्टी झाल्यानंतर आता थंडीची लाट हळूहळू पसरू लागली आहे. पारा 20 अंशापर्यंत घसरला आहे. सांगली, मिरज या शहरांतील हे तापमान आहे. अतिवृष्टीनंतर जमिनी ओल्या असल्याने ग्रामीण भाग अधिकच गारठला आहे. 

एकीकडे दिवाळीची धामधुम सुरु असताना गारठा वाढू लागला आहे. पुढील आठवडाभरात पारा आणखी घसरेल, असा हवामानाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सध्या कमाल तापमान 29 अंश तर किमान तापमान 20 अंशापर्यंत खाली आहे. यंदा पश्‍चिम महाराष्ट्रातही थंडीची लाट येईल, असा अंदाज आहे. पहिल्या टप्प्यातील थंडी पाहता तो खरा ठरेल, अशीच सर्वत्र चर्चा आहे. सध्या भूजलपातळी वाढली आहे. सगळीकडे पाणीसाठे वाढले आहेत. त्याचाही परिणाम या काळात होणार आहे. ग्रामीण भागात थंडी अधिक जाणवते आहे. 

गेल्यावर्षी थंडी अजिबात जाणवली नव्हती. थंडीशी निगडीत बाजारपेठ ठप्प झाली होती. श्‍वेटर, मफलर, कानटोप्या, रजई विकणाऱ्यांना दुकाने गुंडाळावी लागली होती. यंदा मात्र दिवाळीतच त्यांचे चेहरे खुलले आहेत. यंदाची थंडी त्यांचा गल्ला गरम करणार, अशी अपेक्षा ते व्यक्त करत आहेत. संजू लमाणी म्हणाला, ""थंडी वाढेल तसे ग्राहक येत आहेत. यंदा चांगला व्यवसाय अपेक्षित आहे.'' 

मुले, ज्येष्ठांची काळजी गरजेची... 
थंडी वाढेल तसा दुचाकीवरचा प्रवास त्रासदायक ठरू लागला आहे. सर्दीची साथ यायला लागली आहे. या काळात लहान मुले, ज्येष्ठांची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभाग आणि महापालिका आरोग्य विभागाने केले आहे. कोरोना मुक्तांनी या काळात वाफ घेत रहावे, काढा प्यावा, उबदार कपडे वापरावेत, व्यायाम सुरु ठेवावा, असेही आवाहन केले आहे.

संपादन : प्रफुल्ल सुतार 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narhari Zirwal video case : मंत्री नरहरी झिरवाळ प्रकरणाला नवे वळण, कथीत व्हिडिओतील तृतीयपंथीयाची स्वतःच्या भावाविरोधात पोलिसांत तक्रार

New Labour Code लागू! १ एप्रिलपासून पगार, ओव्हरटाईम आणि कामाचे नियम बदलणार; तुमच्या सॅलरीवर नेमका काय परिणाम?

Latest Marathi News Live Update : मेळघाट परिसरात अवकाळी पावसाची हजेरी

IPL 2026: वैभव सूर्यवंशीने भरमैदानात कुणाला दिला Flying KISS? राजस्थान रॉयल्सच्या विजयानंतरचा VIDEO VIRAL..

MLA Vijay Shivtare : बापासाठी काळजाचा तुकडा सरसावला! आमदार शिवतारेंना लेकीने दान केली किडनी; बाप-लेकीच्या नात्याला महाराष्ट्र करतोय 'सलाम'

SCROLL FOR NEXT