barber.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

दारात झाली गर्दी...मग काय? नाभिकांनी थेट ग्रामपंचायतीतच साहित्य केले जमा... 

सकाळवृत्तसेवा

इटकरे (सांगली)- दीड दोन महिन्यात केस दाढी एवढी वाढलीय की शेजाऱ्यांना आपली ओळख करुन द्यावी लागत आहे. अजून किती वाढेल याचा नेम नाही. आता संयम निसटला, नाभिकांच्या दारावर गर्दी झाली. अगोदर विनंती, मग वादावादी. " कात्रीत ' सापडलेल्या नाभिकांनी कर्तनाचे साहित्यच थेट ग्रामपंचायतीत जमा केले. ग्राहकांच्या तगाद्याला वैतागून हे पाऊल उचलणारे नाभिक आहेत वाळवा तालुक्‍यातील कुंडलवाडीचे. 


लॉकडाऊनला आता महिना उलटलाय. तो थांबेल का वाढेल याची शाश्‍वती नाही. या महिनाभरात वाढलेले केस कापण्यासाठी अनेकांनी परस्परांच्या मदतीने चमणकट स्वीकारला. दाढीसाठी ट्रीमर आजमावला. पण चमणकट नको असलेल्यांची मात्र पंचाईत झालीय. त्यांनी गावातील नाभिकांच्याकडे हेलपाटे सुरु केलेत. गुपचूपपणे केस दाढी उरकावी यासाठी कुणाच्या विनवण्या तर कुणाचा दबाव सुरु आहे. तर आलेल्या ग्राहकांचे काम करुन पैसे मिळवावेत की शासकीय नियम पाळावेत अशा कात्रीत नाभिक अडकले आहेत. 
दीड दोन महिन्यात वाढलेल्या केस दाढीने रुपडे पालटलेले इमोशनल ब्लॅकमेल करुन, कुणी आर्थिक अमिष दाखवून तर कुणी थेट जमेल तसा दबाव टाकून नाभिकांच्याकडे हट्ट धरत आहेत. यातून वादावादी होत आहे. कुणाचे केस कापायचे आणि कुणाला नाही म्हणायचे? कुणी आपली तक्रार केली तर काय करायचे? असे प्रश्‍न कारागिरांपुढे आहेत. यावर पर्याय म्हणून कुंडलवाडी येथील नाभिक व्यावसायिकांनी थेट ग्रामपंचायतीचे दार ठोठावले.

इस्लामपूर पाठोपाठ शिराळा, कामेरी, कासेगाव अशा ग्रामीण भागातही कोरानाने पाय पसरायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आपल्या व्यवसायामुळे कोरोना विषाणू संसर्ग पसरण्याचा धोका लक्षात घेत कुंडलवाडी गावातील सर्व व्यावसायिकांनी एकत्र येत विचारविनीमय करुन आपली हत्यारे ग्रामपंचायतीत जमा करायची असे ठरवले. त्यानुसार आज गावातील सर्वच व्यावसायिकांनी आपली हत्याने ग्रामपंचायतीत जमा देखील केली. हत्यारेच ग्रामपंचायतीत जमा करुन तगादा लावणाऱ्यांची तोंडेच कारागिरांनी बंद केली आहेत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: न्यायाधीशाला ‘विकण्याचा’ प्रयत्न, ३० लाखांच्या लाच प्रकरणात ७० वर्षीय वकिलाला सुप्रीम कोर्टाचा जबरदस्त धक्का!

Latest Marathi News Live Update : केरळ, आसामसह पुद्दुचेरीत आज एकाच टप्प्यात मतदान; सकाळी ७ पासून मतदानाला सुरुवात

Chhatrapati Sambhajinagar: शहरात वर्षात ९४ हजार वाहनांची भर; दुचाकींचे प्रमाण सर्वाधिक, आरटीओला ४५६ कोटींचा महसूल

Nashik: बड्या IT कंपनीत महिलेवर ५ वर्षे अत्याचार, महिलांना करायचे टार्गेट; ९ गुन्हे दाखल, ६ जणांना अटक

Chhatrapati Sambhajinagar: वेल्डिंग दोषामुळे ३ कोटी लिटर पाणी वाया; शहरात पाणी पुरवठा दोन दिवस उशिरा

SCROLL FOR NEXT