Hapus Mango Sangli; The rate of muhurta is 4 thousand rupees 
पश्चिम महाराष्ट्र

हापूस आंबा सांगलीत; मुहुर्ताचा दर 4 हजार रूपये 

घनशाम नवाथे

सांगली: द्राक्षाचा हंगाम नुकतेच सुरू झाला असताना फळांचा राजा असलेला आंबा बाजारात यंदा लवकरच दाखल झाला आहे. देवगड येथील हापूस आंबा आणि पायरी आंबा विक्रीसाठी बालाजी चौकातील जुन्या भाजी मंडईजवळील फळ दुकानात आला आहे. 12 व 15 नगाच्या बॉक्‍सचा दर 3500 ते 4 हजार रूपये आहे. 

फळांचा राजा आंबा साधारणपणे मार्च महिन्यात येण्यास सुरवात होते. तत्पूर्वी अन्य भागातील आंबा येतो. परंतू ग्राहकांना खरी प्रतिक्षा असते ती देवगड, रत्नागिरी येथील हापूस आंब्याची. 

यंदा फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात देवगड येथून बालाजी चौकातील शाहरूख मुन्शी यांच्या लेटस्‌ फळ दुकानात हापूसचे 23 बॉक्‍स दाखल झाले आहे. हापूसची बाजारातील पहिलीच एंट्री आहे. दर ही जास्त आहे. 12 व 15 नगाच्या हापूस बॉक्‍सचा दर साडेतीन हजार ते 4 हजार रूपये आहे. 

आंबा दाखल झाल्याचे पाहून तो पाहण्यास आणि दर विचारण्यास गर्दी होत आहे. मुहूर्ताचा आंबा खरेदी करणारे हौशी ग्राहकही आहेत. हापूसबरोबर यंदा पायरीही लवकरच दाखल झाला आहे. पायरी आंब्याच्या डझनाच्या बॉक्‍सचा दर 2500 रूपये इतका आहे. यंदा आंब्याची आवक भरपूर आहे. हंगामाच्या शेवटी ती जास्त असेल, असे मुन्शी यांनी सांगितले.


संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder: 1 ऑक्टोबरपासून 'एलपीजी'बाबतच्या नियमांमध्ये मोठे बदल; 'या' ग्राहकांना मिळणार नाही लाभ

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये ट्रॅक्टर वेल्डिंगवेळी स्फोट, चौघांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी

Dharashiv News : आदित्य ठाकरे, अंबादास दानवे यांनी धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा केला पाहणी दौरा; शेतकऱ्यांनी अत्यंत पोटतिडकीने आपल्या व्यथा मांडल्या

Police Commissioner Amitesh Kumar : ध्वनी मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई; वेळेपेक्षा भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य

Karad Ganpati Visarjan : कऱ्हाडच्या मिरवणुकीत दिसली बदलाची चाहूल; डीजेच्या दणदणाटापेक्षा वाद्यांचा गजर, गुलालएेवजी खुलला भक्तीचा रंग

SCROLL FOR NEXT