Hasan Mushrif Comment on Klhapur Guardian Minister 
पश्चिम महाराष्ट्र

पालकमंत्रीपदावरून मंत्री हसन मुश्रीफ यांची गुगली

सकाळ वृत्तसेवा


कोल्हापूर  ः जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी मोठा भाऊ म्हणून माझेच नांव गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी सुचवावे, अशी गुगली आज ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी टाकली. गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीतच ही गुगली टाकल्याने जिल्हा परिषद सदस्याही आवाक झाले. पदासाठी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचे नांव जरी पुढे आले तरी माझी काहीही हरकत नाही, अशी पुष्टीही श्री. मुश्रीफ यांनी जोडली.
पालकमंत्री पदी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती झाली आहे. त्याचवेळी श्री. मुश्रीफ यांची नगरचे तर श्री. पाटील यांची भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाली. कोल्हापूरचे पालकमंत्री पद मिळावे यासाठी या दोघांचेही प्रयत्न होते. त्यातही कॉंग्रेसचे आमदार जिल्ह्यात जास्त असल्याने पद मिळावे यासाठी श्री. पाटील यांनी ताकद लावली होती. दरम्यानच्या काळावत श्री. थोरात यांनीच पालकमंत्री पद स्वीकारण्यास नकार दिला आहे.

हे पण वाचाराणेंवर दबाव ठेवण्यासाठी रत्नागिरीत सामंत अस्त्र

या पार्श्‍वभुमीवर शासकीय विश्रामगृहावर बैठकीसाठी आलेल्या श्री. मुश्रीफ यांना विचारले असता ते म्हणाले, ""मोठा भाऊ समजून श्री. पाटील यांनी माझे नांव पालकमंत्री पदासाठी सुचवावे. जिल्ह्यात कॉंग्रेसचे आमदार जास्त असल्याने श्री. पाटील यांचे नांव पालकमंत्री पदासाठी पुढे आल्यास माझी हरकत नाही. यावरून मी व सतेज पाटील यांच्यात कोणताही वाद किवा इर्षा नसल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis:...हा तर पोळी भाजण्याचा डाव; दिल्लीतील आंदोलनावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

Maharashtra Revenue Department: महसूल विभागाच्या सेवाप्रवेश नियमांत ५० वर्षांनंतर बदल; चंद्रशेखर बावनकुळे: मंत्रिमंडळाने दिली मंजुरी

Live Updates Marathi : सरकार नीट परीक्षेच्या मुद्द्यांवर संसदेत चर्चेला तयार

Petrol-Diesel Price Today: अमेरिकेत पेट्रोल महागल्यानंतर आज भारतात पेट्रोल-डिझेलचे दर अपडेट! मुंबई-पुण्यात काय आहे भाव?

Farmer Loan Waiver: दोन लाख शेतकरी पहिल्या यादीत; कर्जमुक्ती योजना; आधार प्रमाणीकरण, फार्मर आयडी अनिवार्य

SCROLL FOR NEXT