Hatkanangale Lok Sabha 2024 Esakal
पश्चिम महाराष्ट्र

Hatkanangale Lok Sabha 2024: हातकणंगल्यात राजू शेट्टींमुळे येणार रंगत; शेट्टींच्या होमपीचवर सर्वच पक्ष सावध

Hatkanangale Lok Sabha 2024: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांची प्रतिष्ठा पणाला लावणारी हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची निवडणूक चुरशीची होण्याचे संकेत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Hatkanangale Lok Sabha 2024: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांची प्रतिष्ठा पणाला लावणारी हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची निवडणूक चुरशीची होण्याचे संकेत आहेत. शेट्टी यांचे होमपीच म्हणून ओळख असणाऱ्या या मतदारसंघात सर्वच पक्ष उमेदवार देताना सावध पावले टाकत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या निवडणुकीत मतदारसंघात शेट्टी यांच्या प्रचारार्थ सभा गाजविल्या आहेत. आता मात्र ते मोदींच्या विरोधकांच्या भूमिकेत आहेत. शेट्टी यांच्यामुळे हातकणंगलेच्या निवडणुकीकडे राज्याचेच नव्हे तर देशाचे लक्ष लागून राहिले आहे.

२०१९ चे चित्र

धैर्यशील माने (शिवसेना) विजयी मते : ५,७४,०७७

राजू शेट्टी (स्वाभिमानी) मते : ४,८०,२९२

अस्लम सय्यद (वंचित बहुजन आघाडी) मते : १,२०,५८४

संग्राम गायकवाड (अपक्ष) मते : ८,६९५

विजयी उमेदवारांचे मताधिक्य : ९६,०३९

वर्चस्व

२००४ : राष्ट्रवादी

२००९ : स्वाभिमानी

२०१४ : स्वाभिमानी

२०१९ : शिवसेना

सद्य:स्थिती

राजू शेट्टींमुळे लढतीकडे विशेष लक्ष

बदललेल्या राजकीय संदर्भांच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीची गणिते बदलली

हे मुद्दे प्रभावी ठरणार

मराठा आंदोलनाचाही परिणामाची शक्यता

इचलकरंजीचा पाणी प्रश्न कळीचा मुद्दा

शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधाचा मुद्दा प्रचारात गाजणार

रत्नागिरी-नागपूर महामार्गात अखेरच्या टप्प्यातील चौपट भरपाईचा मुद्दा चर्चेत येणार

ऊस दराचे आंदोलन

यंत्रमाग व्यवसायातील चढ-उतार

महापूरप्रश्नी धोके आणि उपाय योजना

प्रलंबित, ड्रायपोर्ट प्रकल्प

शिराळा शाहूवाडी पन्हाळा रोजगाराचा प्रश्न

तीर्थक्षेत्र विकासाचा प्रश्न

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News: वडिलांसोबत दुचाकीवरून जात होती; तेवढ्यात काळानं घात केला अन्..., २० वर्षीय लेकीनं जीव गमावला

Pune Thar Donkey Viral Video : पुणेकरांचा नादच खुळा!, चक्क लाखोंची 'THAR' गाढवं समोर बांधून भररस्त्यानं वाजवत, ओढत नेली शोरूमला

Video : हर हर महादेव! कैलाश पर्वत सोनेरी किरणांनी न्हाऊन निघालं..सुर्योदयाचा चमत्कारिक व्हिडिओ व्हायरल, दिवसभरात 10 लाख Views

मानधन नाही तर 'या' कारणासाठी शैलेश लोढांनी सोडला तारक मेहता का उल्टा चष्मा; स्वतःच उघड केलं कारण !

Navi Mumbai: नवी मुंबईतील वाहतूक कोंडी सुटणार! सर्वात वर्दळीच्या 'या' ठिकाणी ब्रिज बांधणार, कधी आणि कुठे ? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT