Jayant Patil Pratik Patil  esakal
पश्चिम महाराष्ट्र

प्रतीक पाटील लोकसभा लढविणार? जयंत पाटलांनी राजू शेट्टींबाबत व्यक्त केली भीती; म्हणाले, प्रतीक यांना उतरवण्याचा..

हातकणंगले मतदारसंघातून माजी खासदार राजू शेट्टी स्वतंत्रपणे लढले तर विरोधकांना त्याचा फायदा होईल.

सकाळ डिजिटल टीम

राष्ट्रवादी काँग्रेस १० ते १२ जागा लढवून यश मिळवेल. या निवडणुकीसाठी शिवसेनेने (ठाकरे) सांगली, कोल्हापूर आणि हातकणंगलेची मागणी केली आहे.

इस्लामपूर : लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) प्रतीक पाटील (Prateek Patil) यांना उतरवण्याचा आमचा विचार नाही, अशी स्पष्ट भूमिका मांडत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. हातकणंगले मतदारसंघातून माजी खासदार राजू शेट्टी स्वतंत्रपणे लढले तर विरोधकांना त्याचा फायदा होईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

प्रतीक पाटील यांनी हातकणंगले किंवा सांगलीतून लढावे, याबाबत चाचपणी केल्याचे याआधी जयंत पाटील यांनी जाहीर केले होते. त्यामुळे प्रतीक नेमके कुठून लढणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली होती. हातकणंगलेतील हालचालींवर त्याचा थेट परिणाम दिसत होता. आज त्या चर्चांना जयंत पाटील यांनी पूर्णविराम दिला.

येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखा सभागृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील, संचालक ॲड. चिमण डांगे प्रमुख उपस्थित होते.शेट्टींबाबत ते म्हणाले, ‘राजू शेट्टी (Raju Shetti) हे उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात होते. ते महाविकास आघाडीला साथ देतील असे वाटले होते. मात्र, आता ते स्वबळाची भाषा करीत आहेत. त्याचा विरोधकांना फायदा होईल.’

आमदार पाटील म्हणाले, ‘लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीला लोकांचा चांगला प्रतिसाद आहे. राज्यातील जनता उत्स्फूर्तपणे आमच्या पाठीशी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस १० ते १२ जागा लढवून यश मिळवेल. या निवडणुकीसाठी शिवसेनेने (ठाकरे) सांगली, कोल्हापूर आणि हातकणंगलेची मागणी केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही जागांवर ते हक्क सांगत आहेत. सांगलीसाठी काँग्रेस आग्रही आहे. अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. येत्या आठवड्यात बैठक होईल, त्यात या जागा निश्चित होतील.’

काँग्रेसच्या टीकेशी माझा संबंध नाही

विश्‍वजित कदम यांनी सांगलीत बोलताना की, ‘सांगली लोकसभा मतदारसंघाबाबत कोण अडचण निर्माण करीत आहे, हे सर्वांना माहिती आहे’, असे विधान केले होते. त्याबाबत जयंत पाटील म्हणाले, ‘सांगलीत काँग्रेस नेत्यांकडून जी काही वक्तव्ये झाली आहेत, त्याच्याशी माझा काही संबंध नाही.’

..तर सांगली काँग्रेसला

जयंत पाटील म्हणाले, ‘महाविकास आघाडीत योग्य वाटाघाटी झाल्यास सांगली काँग्रेसकडेच राहील. कोल्हापूरमधून शाहू महाराज काँग्रेसमधून लढण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे शिवसेनेने सांगलीसाठी जास्त आग्रह धरला आहे.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran MoU Signed: मोठी बातमी! अमेरिका-इराण यांच्यातील सामंजस्य करारावर दोन्ही देशांच्या स्वाक्षऱ्या; 'या' दिवशी पूर्ण क्षमतेने सुरु होणार 'होर्मुज'

Vidhan Parishad Election : गंगापूरमध्ये महायुती विरुद्ध मविआ लढत; ३३ पैकी ३१ मते महायुतीकडे, तरीही निकालाकडे तालुक्याचे लक्ष

IND vs AFG, ODI: 'रोहित शर्माची काहीच चूक नव्हती...' शुभमन गिलसोबतच्या रनआऊट वादावर आर अश्विन स्पष्टच बोलला

Karad Airport Issue : कऱ्हाड विमानतळ घेईना ‘टेक-ऑफ’! विस्तारीकरणासाठी २२१ कोटी मंजूर होऊनही कार्यवाही संथच

Janhavi Virkar : बारामतीच्या लेकीची भारताच्या जर्सीपर्यंत झेप; सावळच्या जान्हवीची भारतीय महिला अंडर-१९ क्रिकेट संघात निवड

SCROLL FOR NEXT