पश्चिम महाराष्ट्र

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात युतीचे पाच आमदार; तरीही उमेदवाराचा शोध

सदानंद पाटील

कोल्हापूर - हातकणंगले लोकसभा मतदारसंघांतर्गत असलेल्या सहा विधानसभा जागांपैकी पाच जागा भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीकडे, तर एक जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. या लोकसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, पालिकाच काय; बहुतांश ग्रामपंचायतींवर युतीचा वरचष्मा आहे. इतके सारे राजकीय बलाबल पाहता युती भक्‍कम अवस्थेत दिसत आहे. आकडेवारीत युती भक्‍कम असली तरी या मतदारसंघावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या खासदार राजू शेट्टी यांनी आपली पकड घट्ट ठेवली असल्याचे मागील दोन टर्ममध्ये दिसून आले आहे. त्यामुळे २०१९ च्या निवडणुकीत खासदार शेट्टी यांच्या विजयाचा वारू रोखणारा उमेदवार शोधताना भाजपची चांगलीच दमछाक होत असल्याचे चित्र आहे. 

लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. साखर कारखानदारांचे वर्चस्व असलेला व काँग्रेस-राष्ट्रवादीचा हक्‍काचा मतदारसंघ म्हणून हातकणंगले मतदारसंघाची ओळख होती. मात्र राजू शेट्टींची मतदारसंघातील पकड पाहून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अनेक खमक्‍या उमेदवारांनीही त्यांच्याविरोधात लढण्यास नकार दिला. शेट्टींनी २००९ मध्ये ‘राष्ट्रवादी’च्या निवेदिता माने यांचा पराभव केला; तर २०१४ च्या निवडणुकीत भाजप-सेनेच्या मदतीने खासदार शेट्टींनी काँग्रेसच्या कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्यासारख्या साखरसम्राटांना अस्मान दाखविले.

या वेळी मात्र चित्र उलटे आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी-स्वाभिमानीचा एकत्र प्रवास सुरू आहे. खासदार शेट्टींना उमेदवारी देऊन काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील नेत्यांनी उमेदवारीपासून आपली सुटका करून घेतली आहे. मात्र विरोधात असलेल्या भाजप-सेनेला खासदार शेट्टींविरोधात उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे. युती झाली आणि नाही झाली तरी भाजपला या मतदारसंघातून उमेदवार उभा करावा लागेल. कारण मागील वेळी हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला होता. त्यामुळे भाजपकडून माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या स्नुषा व जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक यांचे नाव आघाडीवर आहे. महाडिक यांची सहाही विधानसभा मतदारसंघांत स्वत:ची ताकद आहे. त्यामुळे महाडिक यांच्या उमेदवारीचा आग्रह राहणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yamini Jadhav: यामिनी जाधव यांना शिवसेनेकडून दक्षिण मुंबईमधून उमेदवारी

Amit Shah Fake Video Case : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई, दोघांना अटक; आप अन् काँग्रेसशी लिंक?

Mumbai Indians: 'मुंबई संघात फूट पडलीये म्हणूनच...', ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार स्पष्टच बोलला

The Great Indian Kapil Show: अन् दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी आलं; 'या' कारणामुळे कपिल शर्मा शोमध्ये सनी आणि बॉबी देओल झाले भावूक

Nashik Fraud Crime : आर्किटेक्टला साडेपाच लाखांना घातला गंडा! संशयित युवतीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT