पश्चिम महाराष्ट्र

क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कन्या हौसाक्का यांचे निधन

अजित झळके

त्यांच्या रुपाने स्वातंत्र्य लढ्यातील एक धगधगता निखारा आणि जाज्वल्य इतिहासाच्या साक्षीदार हरपल्याची भावना जिल्ह्यात व्यक्त होत आहे.

सांगली : ब्रिटिश सत्तेला प्रतिसरकार स्थापन करून आव्हान देणारे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कन्या क्रांतिविरांगणा हौसाक्का भगवानराव पाटील (hausatai patil) (वय ९३) यांचे आज निधन झाले. त्यांच्या रुपाने स्वातंत्र्य लढ्यातील एक धगधगता निखारा आणि जाज्वल्य इतिहासाच्या साक्षीदार हरपल्याची भावना जिल्ह्यात व्यक्त होत आहे. (krantisinh nana patil)

हणमंतवडिये (ता. कडेगाव) येथे त्यांचा निवास होता. चार दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खालावल्याने कराड येथील कृष्णा रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. आज उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. डाव्या चळवळीशी त्या अखेरच्या क्षणापर्यंत जोडून राहिल्या. सामान्य लोकांच्या प्रश्‍नांसाठी त्यांनी लढे दिले. माजी आमदार भाई भगवानराव पाटील यांच्या त्या पत्नी होत. शेतकरी कामगार पक्षाचे नेते ॲड. सुभाष पाटील, प्रा. विलास पाटील यांच्या त्या आई होत.

हौसाक्कांनी आयुष्यभर कष्टकऱ्यांच्या प्रश्‍नासाठी संघर्ष केला. २००२ साली खानापूर तहसिल कार्यालयासमोर १०३ दिवसांच धरणे आंदोलन केले. दुष्काळ प्रश्‍नावर तेथे जनावरे बांधून प्रशासनाला आव्हान दिले. ताकारी व टेंभू योजनेच्या पाणी प्रश्‍नासाठी सातत्याने संघर्ष केला. माजी राष्ट्रपती सौ. प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Suryakant : लडाखमध्ये नवं न्यायालय सुरू; दुर्गम भागात न्याय मिळणं होणार सोपं, CJI सूर्यकांतांचं मोठं विधान

Chhatrapati Sambhajinagar: ना होर्डिंग, ना डीजे, तरीही जयंती दणक्यात साजरी!; महावीर जयंतीनिमित्त जैन समाजाने घालून दिला आदर्श

New Rules From April 1 India : देशात आजपासून अनेक कायदे आणि नियमांत बदल होणार, डिजीटल पेमेंटसाठी कडक सुरक्षा

Latest Marathi News Live Update : हवाई दलासाठी पर्वतीय रडारची खरेदी

आनंदाची बातमी! विद्यार्थिनींना मिळणार दोन हजार विद्यावेतन: चंद्रकांत पाटील यांची घोषणा, ‘कमवा आणि शिका’ उपक्रम

SCROLL FOR NEXT