corona.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

कोरोनाचा जिल्ह्यात कहर : बिळूर येथील 24 आणि महापालिका क्षेत्रातील 6 रूग्णांसह दिवसभरात 40 रूग्ण आढळले...तिघांचा मृत्यू

सकाळवृत्तसेवा

सांगली- जिल्ह्यात "कोरोना' ने कहर केला असून आज सर्वाधिक 40 रूग्णांचा अहवाल "पॉझिटीव्ह' आला. यामध्ये बिळूर (ता. जत) येथील 24 आणि महापालिका क्षेत्रातील 6 रूग्णांसह विटा येथील तीन, कानकात्रेवाडी (ता. आटपाडी) तील दोन, नेलकरंजी (ता. आटपाडी), गार्डी (ता. खानापूर), वाळवा, इस्लामपूर, करंजवडे येथील प्रत्येकी एक रूग्णाचा समावेश आहे. तसेच परजिल्ह्यातून येऊन सांगलीत हॉटेल क्वारंटाईन असलेले चौघेजण बाधित असल्याचे आढळले. तर येळावी (ता. तासगाव) येथील 55 वर्षीय महिला, नांदणी (जि. कोल्हापूर) येथील रूग्ण आणि अथणी (कर्नाटक) येथील रूग्ण अशा तिघांचा आज मृत्यू झाला. जिल्ह्यात आजअखेर 476 रूग्ण आढळले असून 201 जण सद्यस्थितीत उपचार घेत आहेत. 

जिल्ह्यात आजपर्यंत एकाच दिवसात 23 रूग्ण आढळण्याचा उच्चांक होता. तो आज मोडला गेला असून दिवसभरात 40 रूग्ण आढळले. त्यामध्ये कोरोनाचे नविन हॉटस्पॉट बनलेल्या जत तालुक्‍यातील बिळूरमध्ये 24 जण एकाच दिवसात "पॉझिटीव्ह' आढळले. त्यामुळे बिळूरमध्ये आजअखेर 52 जणांचा कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आज नव्याने आढळलेल्या 24 रूग्णांमध्ये 4 मुलींसह 16 महिलांचा आणि दोन मुलांसह 8 पुरूषांचा समावेश आहे. एकाच दिवसात 24 रूग्ण आढळल्यामुळे गावात खळबळ उडाली आहे. 

जिल्ह्यातील ग्रामीण भागात रूग्ण आढळत असतानाच महापालिका क्षेत्रात आज दिवसभरात दहा रूग्ण आढळले. गणपती पेठत 68 वर्षाचा वृद्ध, कलानगर येथे 65 वर्षाचा पुरूष, शंभरफुटी रस्ता येथील रूग्णालयातील 45 वर्षीय परिचारिका, कर्नाळ दत्तनगर येथील 21 वर्षीय महिला, कलानगर येथील 57 वर्षाचा पुरूष आणि मिरजेतील ब्राह्मणपुरीतील 87 वर्षीय वृद्ध यांच्यासह हॉटेल क्वारंटाईन असलेले चौघे यांचा समावेश आहे. हॉटेल क्वारंटाईन चौघांपैकी कोल्हापूरचे तीन तर सोलापूरचा एक रूग्ण आहे. 

आज कानकात्रेवाडी (ता. आटपाडी) येथील 47 आणि 35 वर्षीय महिला कोरोना बाधित आढळल्या. तसेच नेलकरंजे (ता. आटपाडी) येथील 55 वर्षीय पुरूषाचा कोरोना अहवाल "पॉझिटीव्ह' आढळला. गार्डी (ता. खानापूर) येथील 22 वर्षाचा तरूण तसेच विटा येथे हॉटेल क्वारंटाईन झालेला 21 वर्षाचा पुरूष व 21 वर्षाची महिला कोरोना पॉझिटीव्ह आढळली. वाळवा येथे 68 वर्षाच्या वृद्धास कोरोना तसेच इस्लामपूर व करंजवडे येथे हॉटेल क्वारंटाईन असलेल्या 20 आणि 22 वर्षाच्या तरूणास कोरोना झाला आहे. तसेच कर्नाटकातून आलेल्या तिघांचा कोरोना अहवाल "पॉझिटीव्ह' आला आहे. 
आज दिवसभरात नांदणी (कोल्हापूर) येथून वॉनलेस हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या रूग्णाचा, येळावी (ता. तासगाव) येथील 55 वर्षीय महिलेचा आणि अथणी (कर्नाटक) येथून आल्यानंतर कोव्हीड रूग्णालयात उपचार घेणाऱ्या रूग्णाचा मृत्यू झाला. दिवसभरात कोरोनाचे तीन बळी गेले आहेत. 

सातजण अतिदक्षता विभागात- 
अमरापूर येथील महिला, बिळूर येथील वृद्ध, बुधगाव येथील वृद्ध, कानकात्रेवाडीतील पुरूष, जयसिंगपूर येथील वृद्ध, नेलकरंजे येथील पुरूष, जुन बुधगाव रस्ता सांगलीतील वृद्ध हे सात रूग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. तर आज दिवसभरात मणदूर, कवठेमहांकाळ, शेटफळे, लेंगरेवाडी, शिराळा, गोमेवाडी, आंधळी येथील एकुण सातजण कोरोनामुक्त झाले. 
जिल्ह्यातील चित्र- 

  • आजचे नविन पॉझिटीव्ह रूग्ण- 40 
  • उपचार घेत असलेले रूग्ण- 201 
  • आजअखेर बरे झालेले रूग्ण- 262 
  • आजअखेर मृत झालेले रूग्ण- 12 
  • आजअखेरचे पॉझिटीव्ह रूग्ण- 476 

...तर बंधने आणावी लागतील- 
जिल्ह्यात कोरोना रूग्णांचे प्रमाण वाढत चालले आहे. तरीही अनेक नागरिक बेफिकीर दिसून येत आहेत. नियमांचे उल्लंघन केले जात आहे. परिस्थिती आटोक्‍यात ठेवण्यासाठी प्रशासन आवश्‍यक उपाययोजना करत आहे. नागरिकांनी अफवांवर विश्‍वास ठेवू नये. प्रशासनाच्या आवाहनानंतरही कोणी नियमाचे उल्लंघन करत असतील प्रशासनाला बंधने आणावी लागतील असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी "सकाळ' शी बोलताना दिला. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT