Hazare says Silent agitation until death of Nirbhaya accused 
पश्चिम महाराष्ट्र

निर्भयाच्या आरोपींना फाशी होईपर्यंत मौन : हजारे

सकाळ वृत्तसेवा

पारनेर : दिल्लीतील निर्भया अत्याचार व खून प्रकरणातील चारही आरोपींना पतियाळा न्यायालयाने 22 जानेवारी रोजी फाशी देण्याचा निर्णय दिला. मात्र, आपण आताच मौन थांबविणार नाही. निर्भयाच्या आरोपींना फाशी होत नाही, तोपर्यंत आपण मौनावर ठाम असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज पुन्हा एकदा स्पष्ट केले. 

निर्भयाच्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा झाल्याने जनतेचा, महिलांचा न्याय व्यवस्थेवरील विश्वास दृढ होईल, असे सांगत हजारे यांनी देशाचे संविधान सर्वोच्च असल्याचेही लेखी प्रतिक्रियेत म्हटले आहे. आपला देश कायद्याच्या आधारे चालतो. निर्भया प्रकरणात न्यायालयाने 2013मध्येच आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली होती. परंतु सात वर्षांत त्या शिक्षेची अंमलबजावणी झाली नाही. पतियाळा न्यायालयाने आज आरोपींच्या फाशीच्या शिक्षेची तारीख व वेळ जाहीर करून जनतेच्या मनात पुन्हा एकदा विश्वास निर्माण केला आहे. न्याय व्यवस्थेत "देर है लेकिन अंधेर नही' असे हजारे यांनी म्हटले आहे. 

मरणाची भीती प्रत्येकालाच

लेखी संवादात अण्णा हजारे म्हणतात, ""निर्भया प्रकरणात गुन्हेगारांना फाशीची शिक्षा सुनावल्याने महिलांवर अन्याय, अत्याचार करणाऱ्यांवर धाक निर्माण होईल. अन्याय करणारे आरोपी गुंड प्रवृत्तीचे असले, तरी प्रत्येकाला मरणाची भीती असतेच. देशात अशा अनेक पीडित निर्भया आहेत, त्यांनाही लवकरच न्याय मिळेल.'' 

आंदोलनाचा 19वा दिवस

निर्भया प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी, महिला अत्याचाराच्या घटनेचा तपास तातडीने करावा, महिलांसाठी राष्ट्रीय पातळीवरील "हेल्पलाइन' सुरू करावी, महिला अत्याचाराच्या घटनांचा तपास महिला अधिकाऱ्यांनीच करावा, आदी मागण्यांसाठी हजारे यांनी 20 डिसेंबर 2019 पासून राळेगणसिद्धी येथील संत यादवबाबा मंदिरात मौन आंदोलन सुरू केले आहे. या मौन आंदोलनाचा आजचा 19वा दिवस होता. पतियाळा न्यायालयाने निर्भयाच्या आरोपींना 22 जानेवारी रोजी सकाळी सात वाजता फाशी देण्याची शिक्षा जाहीर केली. मात्र, त्यानंतरही अण्णा हजारे आपल्या मौन आंदोलनावर कायम होते. शिक्षेची अंमलबजावणी झाल्यावरच आंदोलन मागे घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Farmer Loan Waiver: आमदार प्रशांत बंब यांची पत्रकार परिषद; प्रत्येक पात्र शेतकऱ्यापर्यंत योजनेचा लाभ पोहोचविण्यासाठी विशेष मोहीम

वयाच्या ५४ वर्षीही लाचेचा मोह! एक लाखाची लाच मागणारा मंडलाधिकारी अटकेत; मुरूम वाहतुकीच्या परवानगी अर्जावरील सकारात्मक अहवालासाठी मागितली लाच, वाचा...

Shirur civic protest: घनकचरा गैरव्यवहार, किमान वेतन उल्लंघनासह विविध मागण्यांसाठी मनसेचे महिबूब सय्यद यांचे शिरूर नगरपरिषदेसमोर अन्नत्याग आंदोलन

Dighi-Bhosari MD lab bust: पुण्यातील दिघी-भोसरीत एमडीची हायटेक प्रयोगशाळा उघड; ‘ऑपरेशन वज्र’मध्ये दोन प्रमुख तस्कर अटकेत

‘एसआयआर’ कामात हलगर्जीपणा, शिक्षकाविरुद्ध गुन्हा! फोन उचलला नाही, घरी भेटले नाहीत, ‘कारणे दाखवा’चा खुलासाही दिला नाही, वाचा...

SCROLL FOR NEXT