doctor 
पश्चिम महाराष्ट्र

संभाजी ब्रिगेड म्हणते, "ते शहीद'च

सकाळवृत्तसेवा

सांगली ः कोरोनाविरोधी लढाईत मयत होणाऱ्या पोलिस, डॉक्‍टर आणि कर्मचाऱ्यांचे कार्य महान असणार आहे.

त्यांना शहिदाचा दर्जा दिला जावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सुयोग औंधकर यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांना पाठवण्यात आले आहे.

त्यात म्हटले आहे, की कोरोना महामारीविरुद्ध आंतरराष्ट्रीय स्थरावरील हालचाली पाहता हे जैविक महायुद्ध सुरु आहे. त्यात आपल्या देशातही संकट मोठे आहे. देशातील सर्व राज्यात संघर्ष सुरु आहे. राज्यातील प्रमुख शहरात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या युद्धात आपल्या जिवाची पर्वा न करता पोलीस, डॉक्‍टर, नर्स, स्वच्छता कर्मचारी लढा देत आहेत.

या संवेदशील परिस्थितीमध्ये नागरिकांना सेवा देणारे पोलीस, डॉक्‍टर व हॉस्पीटल चे कर्मचारीसुद्धा मृत झाले आहेत. प्रशासन व आरोग्य क्षेत्रातील व्यक्ती जीवाची पर्वा न करता आपली सेवा बजावत आहेत. त्यांच्या सेवेची योग्य दाखल घेतली जावी. त्यांना देश सेवा बजावत असताना मृत्यू झाला तर शाहिद घोषित करण्यात यावे व त्यांचा यथोचित सन्मान करण्यात यावा.''


या परिस्थितीत सेवा देणारे पोलीस, डॉक्‍टर्स व स्टाफ, स्वच्छता कर्मचारी मृत्यूमुखी पडले तर त्यांना शहिदांचा दर्जा देण्यात यावा व तसेच त्यांच्या कुटुंबाला शहिदांच्या कुटुंबाप्रमाने सर्व सुविधा पुरविण्यात याव्यात, अशी मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजयला रोखण्यासाठी स्टालिन यांचा होता 'भाजप'वाला प्लॅन, 'शत्रू'सोबत हातमिळवणीची दिलेली ऑफर; मोठ्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

Shaktipeeth Highway : शक्तिपीठ महामार्गावरून विधानसभेत खडाजंगी! विरोध झुगारून सरकार प्रकल्प पुढे रेटणार? MSRDC च्या हालचालींना वेग, काय म्हणाले मंत्री शिवेंद्रराजे?

Mumbai Local: 'चार मर्डर केलेत, आता तुझा नंबर', लोकलमध्ये मद्यधुंद व्यक्तीचा धिंगाणा, जीवे मारण्याची धमकी; VIDEO VIRAL

Ayodhya Ram Mandir Theft : राम मंदिरातील योग केंद्रात काळाबाजार? रहस्यमय पेटीवर QR कोड; अयोध्या राम मंदिर चोरी प्रकरणात धक्कादायक खुलासे

SCROLL FOR NEXT