He was finally nominated as the BJP's Jamkhed taluka president 
पश्चिम महाराष्ट्र

भाजपच्या जामखेड तालुकाध्यक्षपदी अखेर यांची वर्णी 

सकाळ वृत्तसेवा

जामखेड : उत्कंठावर्धक ठरलेल्या आणि इच्छुकांची संख्या अधिक असलेल्या भाजप जामखेड तालुकाध्यक्षपदी अजय काशीद यांची निवड झाली. काशीद यांना निवडीचे पत्र भाजपाचे नगर दक्षिण जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी दिले. त्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून असलेली चुरस यानिमित्ताने संपुष्टात आली. 

जाणून घ्या : फेसबुक आलंय वयात..

यापूर्वी जिल्हा संघटनेत काम 
यापूर्वी काशीद यांनी भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष या पदावर संघटनेत काम केले आहे. तसेच महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेचे नगर जिल्हा अध्यक्ष म्हणून ही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. सारोळा (ता.जामखेड) येथील विद्यमान सरपंच म्हणून ते जबाबदारी सांभाळत आहेत. 

अर्धा डझन होते इच्छुक 
जिल्ह्यातील बहुतांशी तालुका अध्यक्षाचा निवडीपूर्वी झाल्या होत्या. मात्र, जामखेडची निवड मागे राहिली होती. जामखेडमधून या पदासाठी अर्धा डझन कार्यकर्ते इच्छुक होते. यामध्ये अजय काशीद यांचाही समावेश होता. सर्वानुमते या पदावर काशीद यांचीच वर्णी लागावी, याकरिता स्वतः माजी मंत्री राम शिंदेंचाही प्रयत्न राहिला होता. त्यानुसार काशीद यांच्या खांद्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली. 

निवडीला महत्त्व 
कर्जत-जामखेड विधानसभा मतदार संघात राजकारणाचे चित्र बदलले आहे. गेली 35 वर्ष भाजपाच्या ताब्यात असलेला हा मतदारसंघ आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीच्या ताब्यात गेलेला आहे, अशा स्थितीमध्ये काशीद यांची भाजपाच्या तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांच्या निवडीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. 

जबाबदारी ताकदीने पार पाडू 
निवडीनंतर काशीद म्हणाले, पक्षसंघटनेत गेल्या दहा वर्षापासून विविध पदावर आपण काम केले आहे. संघटनेत काम करण्याचा पाठिशी असलेला अनुभव निश्‍चितपणे मला तालुका अध्यक्ष म्हणून काम करताना उपयोगी येईल तसेच पक्षाने मला तालुकाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली. त्याचे चीज करू. यापूर्वी तालुक्‍यांमध्ये पक्षाचं संघटन चांगल्या पद्धतीने उभा राहिला आहे. त्या संघटनेला अधिक बळकटी देण्याचा प्रयत्न माझ्या माध्यमातून होईल. ज्येष्ठ मंडळी, युवक कार्यकर्ते यांना विश्वासात घेऊन गावोगाव घरोघरी भारतीय जनता पार्टीचा विचार पोहोचण्याचा माझा प्रयत्न राहील. 


.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : उत्तरप्रदेशात मराठी तरुणाला भोजपुरीत बोलण्यासाठी दमदाटी, भाषा येत नाही म्हटल्यावर....पाहा व्हिडीओ

Latest Maharashtra News Live Updates: नांदगावच्या दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान, ग्रामस्थ आनंदीत

VIRAL VIDEO: दुध विक्रेता चक्क दुधात थुंकला, घटनेचा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

SCROLL FOR NEXT