पश्चिम महाराष्ट्र

आरोग्य विद्यापीठाचे कोल्हापुरातील केंद्र कागदावरच

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - ना स्वतःची जमीन, ना कार्यालय, ना कोणता स्टाफ. ही अवस्था आहे राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांचे संचालन करणाऱ्या आरोग्य विद्यापीठाच्या कोल्हापूर केंद्राची. पूर्वी येथे केंद्र समन्वयक होते मात्र चार महिन्यांपासूनच त्यांनाही कार्यमुक्त केले आहे. एका अर्थाने आरोग्य विद्यापीठाचे कोल्हापूर केंद्र आता केवळ नावालाच उरले आहे. राजकीय अनास्था आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे पश्‍चिम महाराष्ट्रातील वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थी आणि प्राध्यापकांची परवड सुरूच आहे.

महाराष्ट्रातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांचे संचालन नाशिकचे आरोग्य विज्ञान विद्यापीठ करते. या विद्यापीठाची पाच केंद्रे राज्याच्या विविध भागात आहेत. औरंगाबाद, नागपूर, मुंबई, पुणे आणि कोल्हापूर अशी केंद्रे आहेत. यातील कोल्हापूर वगळता सर्व केंद्र पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. त्यांच्याकडे स्वतंत्र जागा, केंद्रसमन्वयक, कर्मचारी अशी सर्व साधने आहेत.

आरोग्य विद्यापीठाकडे केंद्र विस्तारासाठी ११ कोटींचा निधीही आहे. असे असूनही कोल्हापूर केंद्र मात्र सुरुवातीपासूनच उपेक्षित आहे. कोल्हापूर केंद्राचा शासन आदेश २०१७ मध्ये निघाला. त्यानंतर आरोग्य विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. रावराणे महिन्यातून चार दिवस येथील सीपीआरमध्ये येतात. येथील कामाचा निपटारा करतात. कोल्हापूर केंद्राला विभागीय समन्वयकही होते मात्र चार महिन्यांपासून त्यांनाही कार्यमुक्त केल्याचे समजते. त्यामुळे आरोग्य विद्यापीठाच्या कोल्हापूर केंद्राकडे आता ना जागा आहे, ना स्वतंत्र कार्यालय. एवढेच नव्हे तर विभागीय समन्वयकही नाहीत. त्यामुळे कोल्हापूर केंद्र केवळ आरोग्य विद्यापीठाच्या कागदावरच उरले आहे.

आरोग्य विद्यापीठ केंद्राच्या जागेसाठी शेंडा पार्क, वैद्यकीय महाविद्यालय यांच्यासह अन्य काही जागांचे प्रस्ताव होते. मात्र प्रशासनाने यातील एकही प्रस्ताव मंजूर केला नाही. सध्या कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील वैद्यकीय महाविद्यालयांच्या प्राध्यापकांना आणि कर्मचाऱ्यांना नाशिकला जावे लागते. मात्र कारभार पाहता त्यांची ही परवड सुरूच राहणार असे दिसते.

पश्‍चिम महाराष्ट्रातील वैद्यकीय महाविद्यालयांच्यासाठी कोल्हापूर केंद्राची सुरुवात केली आहे. वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा करूनही अद्याप जागा मिळालेली नाही. विभागीय समन्वयक आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती लवकरच करण्यात येणार आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील स्वतंत्र कक्ष केंद्रासाठी देण्यात येणार आहे. लवकरच केंद्र पूर्ण क्षमतेने सुरू होईल.
- डॉ. डी. जी. म्हैसेकर, 

कुलगुरू, आरोग्य विज्ञान विद्यापीठ

कपाट आणि बंद फोन
आरोग्य विद्यापीठाचे कोल्हापूर केंद्र म्हणजे शाहू वैद्यकीय महाविद्यालयात ठेवलेले एक लोखंडी कपाट आणि बिल न भरल्यामुळे बंद पडलेला फोन एवढेच आहे. केंद्र सुरू झाले तरी अजून कर्मचारी, शिपाई कोणाचीच नियुक्ती झालेली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

Waluj Nagar Accident : हळद लागण्यापूर्वीच काळाने घातली झडप, दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

IPL 2024, KKR vs DC Live Score: कोलकाता परतले विजयी मार्गावर, सॉल्टच्या तुफानी अर्धशतकानंतर दिल्लीवर मिळवला सोपा विजय

''सत्तेत आल्यास जातनिहाय आणि आर्थिक सर्वेक्षण करू.. राज्य घटना बदलण्याचा भाजप आणि संघाचा कट'', काय म्हणाले राहुल गांधी?

Satara : कऱ्हाडला घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; महायुतीच्या नेत्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, रखरखत्या उन्हातही मोठा उत्साह

SCROLL FOR NEXT