Monsoon Rain sakal
पश्चिम महाराष्ट्र

Monsoon Rain : दमदार पावसामुळे ओढे-नाल्यांना पाणी

Atpadi News : आटपाडी तालुक्याला पावसाने झोडपून काढले, पेरणीला आला वेग

सकाळ वृत्तसेवा

आटपाडी : शनिवारी मध्यरात्री वरुणराजाने आटपाडी तालुक्याला झोडपून काढले. या तालुक्याच्या पश्चिम भागात प्रचंड पाऊस झाला, तर पूर्व भागात तुलनेत कमी झाला. त्यामुळे पश्चिम भागातील गावोगावचे ओढे-नाले पावसाच्या पाण्याने वाहू लागले. दमदार पावसामुळे खरिपाच्या पेरणीला वेग येणार आहे.

यंदाच्या उन्हाळ्यात आटपाडी तालुक्यात उष्णतेने कहर केला होता. तालुक्यातील तापमानाने मेमध्ये ४२.५ अंशांपर्यंत मजल मारली होती.

तीव्र उष्णतेमुळे वृद्ध आणि बालके आजारी पडण्याचे प्रमाण वाढले होते. दहा दिवसांपूर्वी तालुक्यात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे उष्णतेने होरपळलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. चार दिवसांपासून तालुक्यात कमी-अधिक पाऊस कोसळत आहे.

काल दिवसभर आणि रात्रभर पावसाने अक्षरशः झोडपून काढले. यामध्ये पश्चिम भागातील खरसुंडी, झरे, नेलकरंजी, घरनिकी, घाणंद, मानेवाडी, हिवतड, निंबवडे या गावांत रात्रभर मोठा पाऊस पडला.

तुलनेत पूर्वभागातील करगणी, आटपाडी, दिघंची, कौठुळी, शेटफळे, माडगुळे या भागांत प्रमाण कमी होते. पश्चिम भागात दमदार पाऊस झाल्यामुळे अनेक गावचे ओढे आणि नाले वाहू लागले. दिघंची ते झरे या रस्त्यावरील पुलावरून पाणी गेले.

तसेच निंबवडे ओढ्यालाही पाणी आले. गावोगावचे छोटे नाले पावसाच्या पाण्याने वाहिले. उन्हाळी हंगामात धरलेल्या डाळिंब बागांना पावसाचा चांगला उपयोग होणार आहे. तसेच कापूस, मका, ऊस या पिकांनाही उपयुक्त पाऊस झाला.

खरिपाच्या पेरणीसाठी अपेक्षित पाऊस झाल्यामुळे पेरणीकामाला वेग येणार आहे. तालुक्यातील आठ ते दहा गावांत पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू आहेत. तसेच काही भागात चाराटंचाई निर्माण झाली होती. टंचाईला गावांनाही काही प्रमाणात दिलासा मिळाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway: शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला वेग; पुणे विभागातील चार जिल्ह्यांत ६२०० हेक्टर जमीन संपादित होणार

Satish Jarkiholi ED Raid : मंत्री सतीश जारकीहोळींसह कन्या खासदार प्रियांका जारकीहोळी यांच्या घरांवर ईडीची छापेमारी; १८ ठिकाणी धाड

प्रणालीचं नाव घेताच कल्ला, आपल्याला कुणीही विचारत नाही, भडकली जान्हवी किल्लेकर; व्हायरल व्हिडिओवर किरण माने म्हणाले-

Marathi News Live Updates : लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ; शेतकऱ्यांच्या स्वप्नांची माती, मायबाप सरकारला आर्त हाक

Satara Crime: मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचा AI मॉर्फ केलेला फोटो पोस्ट केल्याप्रकरणी गुन्हा; तीन फेसबुक अकाउंटधारकांसह यूट्यूब चॅनेलवर कारवाई

SCROLL FOR NEXT