shirala rain.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

चांदोली परिसरात अतिवृष्टी : 24 तासांत इतका मिलीमीटर पाऊस 

सकाळवृत्तसेवा

शिराळा (सांगली) - कोकणचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या शिराळा तालुक्‍यात मान्सूनची दमदार एन्ट्री झाल्याने बळीराजा सुखावला आहे. चांदोली धरण परिसरात सकाळी आठ ते सायंकाळी चार पर्यंत आठ तासात 75 मी.मी.पावसाची नोंद झाली असल्याने या परिसरात अतिवृष्टी झाली आहे. 


पहाटेपासून पावसाची संततधार कायम सुरू आहे. मृग नक्षत्रापूर्वीच पावसाने दमदार सुरवात केल्याने लोकांच्या गतवर्षाच्या महापुराच्या आठवणी जाग्या होऊ लागल्या आहेत. शिराळा तालुका हा अतिपावसाचा तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्‍यात एप्रिल आणि मे महिन्यात पाचवेळा वळीवाच्या पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना गती मिळाली. तालुक्‍यात धुळवाफेवर भातपेरणी अंतिम टप्यात आली आहे.

गेले दोन दिवस पावसाची रिमझिम सुरु होती. मात्र आज बुधवारी पहाटे पासून पावसाची संततधार सुरू झाली आहे. हा पाऊस भात उगवणीस उपयुक्त आहे. ऊस पिकाला ही पाण्याची गरज होती. लोकांनी भाताचे तरु पेरण्यास सुरवात केली आहे. आंबा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मणदूर ते चांदोली धरण दरम्यान मुख्य रस्त्यावर झाड उन्मळून पडल्याने कर्मचाऱ्यांना धरणावर जाण्यास काही तास अडचण निर्माण झाली होती. सायंकाळी झाड तोडून वाट रस्ता मोकळा करण्यात आला. 

शिराळा मंडल निहाय पाऊस 
शिराळा तालुक्‍यातील 24 तासातील मंडल निहाय पाऊस(मी. मी. मध्ये) : शिराळा 17, कोकरूड 13, मांगले 26, शिरशी 21, सागाव 20, चरण 30 वारणावती 15. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Bengaluru Highway: पुणे-बंगळूर महामार्गावर वाहतूक कोंडी; दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा; तावडे हॉटेल चौकात गर्दी, वाहनधारक त्रस्त

Ganesh Naik Eknath Shinde : ‘बाटलीतली भूतं बाहेर काढली, आता अंगाशी येत आहेत’; गणेश नाईक-एकनाथ शिंदेंमधील वाद पुन्हा उफाळला

Kolhapur Politics: मंत्री हसन मुश्रीफ-डॉ. विनय कोरे यांच्यात खलबते; बंद दाराआड तासभर चर्चा, तपशील गुलदस्त्यात

IND vs SL Final: भारत-श्रीलंका फायनलमध्ये रंगणार थरार! शेफाली-दीप्ती ठरणार गेमचेंजर; आठव्यांदा ट्रॉफी जिंकण्याची संधी

Kolhapur Accident: मृत्यूने गाठले, घर-संसाराचे स्वप्न अपूर्ण राहिले; प्लंबिंगचे साहित्य घेऊन येताना महेशच्या दुचाकीची थांबलेल्या टेम्पोला धडक

SCROLL FOR NEXT