talmavle-rains.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

तळमावले परिसरात पावसाचा धुमाकुळ; काढणे पूल पाण्याखाली

जयभीम कांबळे

सातारा : येथील परिसरात गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या धो धो पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. कुंभारगाव, काळगाव, ढेबेवाडी, सनबुर विभागातील नदी, ओढे दुथडी भरून आहेत. वांग नदीच्या पात्रात पाण्याची स्तर वाढल्याने नदीवरील कमी उंची असणारे पूल पाण्याखाली गेल्याचे चित्र आहे.

खळे येथील पूल पाण्याखाली गेल्याने भागातील  गुढेकरवाडी, काजारवाडी, डूबलवाडी, पानवळवाडी, शिद्रुकवाडी या गावांचा तळमावले भागाशी संपर्क तुटला आहे. तसेच काढणे येथील कमी उंचीच्या पुलावरून आधीच पाणी जात असल्याने काढणे, बागलवाडी, तुपेवाडी या गावांचा संपर्क तुटला होता.

त्यात खळे येथून पर्यायी रस्ता होता पण तो ही रास्ता आता बंद झाल्यामुळेे ढेबेवाडी आणि तळमावले येथे लोकांना जाण्यासाठी मालदान मार्गे जावे लागत आहे. यामुळे नागरिकांना प्रचंड समस्यांचा सामना करावा लागत आहे.  पुलावरून पाणी जात असल्यामुळे या लगतच दुसरार्‍या नवीन पुलाचे बांधकाम सुरू आहे. असे असले तरी आता खळे येथील पुलावरून ही पाणी जात असल्यामुळे याही पुलाबाबत निर्णय घेऊन याही पुलाची उंची वाढवून नवीन पूल बांधणे गरजेचे आहे.

नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढल्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. एकंदरीत तळमावले-ढेबेवाडी परिसरात पावसाने घातलेला धुमाकूळाने अनेक समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT