Heavy rains flood the Yerla River 
पश्चिम महाराष्ट्र

जोरदार पावसामुळे येरळा नदीला पूर; कमळापूर-रामापूर पूल पाण्याखाली 

दिपक पवार

आळसंद : येरळा नदीच्या कार्यक्षेत्रात रविवारी (ता. 6) रात्री वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला आहे. येरळा नदीला पूर आले आहे. नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. उत्तरा नक्षत्राचा पाऊस चांगला बरसला आहे. यामुळे शेतकरी सुखावला आहे. भाळवणी-शिरगाव, कमळापूर-रामापूर पूल पाण्याखाली गेला आहे. बळीराजा स्मृती धरण पाण्याखाली गेले आहे. तालुक्‍यात सरासरी 62 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. 

रविवार रात्री झालेल्या पावसाने परिसरातील सिमेंट बंधारे, ओढे, नाले भरून वाहत आहेत. विहिरी पाण्याने तुडुंब भरल्या आहेत. ऊसाच्या सरी पाण्याने भरल्या आहेत. वादळी वाऱ्याने ठिकठिकाणी ऊस भुईसपाट झाला आहे.

यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कमळापूर-रामापूर या गावांना जोडणारा कमळापूरचा पूल पाण्याखाली गेला आहे. भाळवणी-शिरगाव पूलाही पाण्याखाली गेला आहे. दोन्ही गावांचा संपर्क तुटला आहे. येरळा दुथडी भरून वाहू लागली आहे. 

'रविवारी रात्री झालेल्या पावसाने येरळानदीला पाणी वाढले आहे. परिसरातील शेतीला त्याचा फायदा होईल . " 
- सुरेश चव्हाण, शेतकरी, बलवडी ( भा.) 

मंडलनिहाय झालेला पाऊस : 
मंडलची नावे पडलेला पाऊस (मिलीमीटर मध्ये) 
विटा : 62 
भाळवणी : 58 
लेंगरे : 51 
खानापूर : 58 
कंरजे : 81 

संपादन : प्रफुल्ल सुतार

सांगली

सांगली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BEST Bus Accident: बेस्टचा भीषण अपघात! रिव्हर्स घेताच पादचाऱ्याला चिरडलं, नंतर बाईक आणि रिक्षावर आदळली; थरारक घटनेचा Video Viral

Pune: बंधाऱ्याचे ढापे वेळेत न काढल्याने शेताचे नुकसान; मुसळधार पावसामुळे शेत वाहून गेले; नुकसानभरपाईची ग्रामस्थांची मागणी

Latest Marathi News Live Update : पिंपरीत इमारत कोसळली, १४ नागरिक अडकले

Parbhani: खड्ड्यांनी पिळले, चिखलानेही छळले!; शहराअंतर्गत प्रमुख रस्त्यांचीच दुरवस्था; पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

Thane News: ठाण्यातील 'या' मोठ्या ८ शाळा बेकायदा, शिक्षण विभागाची माहिती; अ‍ॅडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांचे काय होणार?

SCROLL FOR NEXT