Heavy Rains Floods Affects Sugarcane Recovery  
पश्चिम महाराष्ट्र

साखरेचा उतारा का आला नऊ टक्क्याच्या खाली ?

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - यंदाचा साखर हंगाम सुरू होऊन दोन आठवडे होत आले तरी साखर उतारा मात्र अजून नऊ टक्‍क्‍यांपेक्षा कमीच आहे. महापूर आणि अवकाळी पावसाने घटलेले उसाचे उत्पादन, हंगाम सुरू होण्यास झालेला विलंब आणि कारखान्यांकडून नदीकाठचा बुडीत ऊस नेण्यास होत असलेली टाळाटाळ आदी कारणे उतारा घटण्यामागे आहेत.

दरवर्षीचा साखर हंगाम १ नोव्हेंबरच्या आसपास सुरू होतो; पण यंदा विधानसभेच्या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सरकार स्थापन करण्यास महिन्याचा कालावधी गेला. त्यामुळे हंगामाचे धोरण ठरविण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री समितीची बैठक झाली नाही. राष्ट्रपती राजवट असल्याने राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी फक्त हंगाम सुरू करण्याची तारीख बैठक घेऊन निश्‍चित केली; पण स्वाभिमानी संघटनेने ऊस परिषदेत दराचा निर्णय झाल्याशिवाय हंगाम सुरू न करण्याचा इशारा कारखानदारांना दिला. परिणामी, प्रत्यक्ष हंगाम सुरू व्हायला २२ नोव्हेंबरचा दिवस उजाडला. 

यंदा हा उतारा ८.९५ इतकाच

जिल्हा प्रशासन आणि शेतकरी संघटनांनीही पहिल्या टप्प्यात नदीकाठचा महापूर व अवकाळी पावसाने नुकसान झालेला ऊस गाळपाला प्राधान्याने नेण्याचे आवाहन केले होते. तथापि, कारखान्यांकडून त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. पण, पावसाचे पाणी १५ दिवसांपेक्षा जास्त दिवस ऊस पिकात राहिल्याने उत्पादन व उताऱ्यावरही परिणाम झाला आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात जिल्ह्याचा उतारा १०.५० च्या आसपास होता; पण यंदा हा उतारा ८.९५ इतकाच आहे. हंगाम पुढे जाईल. तसे या उताऱ्यात वाढ होण्याची शक्‍यता आहे. 

४० टक्के ऊस पीक पावसाने वाया

जिल्ह्यात यंदा १८ पैकी १२ सहकारी व सहापैकी चार खासगी कारखान्यांनी हंगाम घेतला आहे. ‘वारणा’ वगळता इतर कारखान्यांनी २२ नोव्हेंबरपासूनच हंगाम सुरू केला. यात काही कारखाने २६ नोव्हेंबरनंतर सुरू झाले आहेत. जिल्ह्यातील सुमारे ४० टक्के ऊस पीक पावसाने वाया गेल्याने तेवढ्या उसाची कमतरता यंदाच्या हंगामात जाणवणार आहे. परिणामी, हंगाम दोन ते अडीच महिने चालेल, अशी स्थिती आहे. 

‘शाहू-कागल’ आघाडीवर

हंगामाच्या पहिल्या पंधरवड्यात साखर उताऱ्यात ‘शाहू-कागल’ कारखान्याने बाजी मारली. त्यांचा उतारा १०.१ टक्के आहे. सर्वांत कमी ४.३४ टक्के उतारा ‘जवाहर-हुपरी’ कारखान्याचा असून, उर्वरित कारखान्यांचा उतारा सात ते 
नऊच्या दरम्यान आहे.

दृष्टिक्षेपात यंदाचा हंगाम (४ डिसेंबरअखेर)

  • हंगाम घेतलेले कारखाने- एकूण १६ 
  • (सहकारी १२, खासगी ४)
  •  एकूण गाळप- ७ लाख ८९ हजार ९३३ टन
  •  एकूण साखर उत्पादन- ७ लाख ६ हजार ८९० क्विंटल
  •  साखर उतारा- ८.९५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tejashwi Yadav FIR : तेजस्वी यादवसह चौघांविरोधात 'FIR' दाखल; जाणून घ्या, नेमकं काय प्रकरण?

Photography Competition : पर्यटनस्थळे ‘क्लिक’ करा, पाच लाखांचे बक्षीस मिळवा; शंभूराज देसाई यांची माहिती

Government Websites : सर्व सरकारी संकेतस्थळे आता होणार मराठीत!

Ashish Shelar : ठाकरेंनी आले‘पाक’ खाणे बंद करावे

CM Devendra Fadnavis : पाच लाखांवरील उपचारांसाठी निधी; उपचारांची संख्या दोन हजारांवर वाढणार

SCROLL FOR NEXT