teacher on mobile.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

हॅलो...हॅलो...मी गुरूजी बोलतोय..काय सांगतात? वाचा.

सकाळवृत्तसेवा

कामेरी (सांगली)-  हॅलो... हॅलो... हा मी गुरुजी बोलतोय... तुमच्या घरात टी.व्ही, मोबाईल आहे का ? रेडिओ आहे का? या साऱ्या खान्या सुमाऱ्या पालकांच्याकडून काढण्याचे काम गुरुजींनी सुरू केले आहे. 

शिक्षण विभागाने एक फतवा काढला असून यात जिल्ह्यात असणाऱ्या माध्यमिक शाळेतील मुलांच्या घरात टीव्ही आहे का? स्मार्ट मोबाइल फोन आहे का? रेडिओ आहे का? यातील कोणतीही सुविधा नाही अशी विद्यार्थी संख्या किती? याची माहिती गोळा करून ती केंद्रप्रमुख यांच्याकडे सादर करण्याबाबत कळवले आहे. याच बरोबर नियमित पूर्णवेळ सुरू होवू शकणारी शाळा, नियमित अर्धवेळ सुरू होऊ शकणारी शाळा, एक दिवस आड पूर्णवेळ व अर्धवेळ सुरू होणारी शाळा, काही विद्यार्थी शाळेत तर काही विद्यार्थी ऑनलाइन राहून अध्यापन करून सुरु होणाऱ्या शाळा, क्वारंटाईनसाठी वापरलेल्या शाळा, अशी सर्व माहिती शाळांना मागवली आहे. 


शाळा कशा प्रकारे चालवाव्यात या उद्देशाने ही माहिती शासन गोळा करीत आहे. मात्र यातील विद्यार्थ्यांची माहिती गोळा करताना आता गुरुजनांना कसरत करावी लागत आहे. गुरुजन काही विद्यार्थ्यांच्या पालकांना फोन करून तुमच्या घरात टीव्ही आहे का? स्मार्टफोन आहे का? रेडिओ आहे का? अशी विचारणा करू लागले आहेत. मात्र ज्यांच्या घरात कोणतीही सुविधा नाही अशांना संपर्क साधने ही कठीण झाले आहे. याच बरोबर ऑनलाईन अभ्यास घेत असलेले शिक्षकांचे नाव व इयत्ता, व्हाट्‌स ऍप, झूम ऍप, दीक्षा ऍप वापरणाऱ्या पालकांची संख्या, पाच पालकांची नावे व मोबाईल नंबर अशीही माहिती देण्याबाबत कळविले आहे. त्यामुळे सर्व जण मोबाईल वर बिझी झाले आहेत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पक्षात खदखद! नेतृत्वावर थेट प्रश्न अन्...; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची भावनिक पोस्ट चर्चेत, काय म्हणाले?

जमीन, जागेची खरेदी-विक्री आता कोणत्याही तालुक्यात! खरेदी-विक्री व्यवहारातून राज्याच्या तिजोरीत ५८,६७३ कोटी; ३१ मार्चपर्यंत सुट्टीतही सुरु राहणार कार्यालये

सोने-चांदीच्या भावात अचानक वाढ! युद्धानंतर सुरू असलेल्या घसरणीला ब्रेक, सोनं ५५००ने तर चांदी ११००० रुपयांनी महाग

Karad News : कऱ्हाड - चिपळुण मार्गावरील अवजड वाहतुक बंद; महामार्गाच्या कामासाठी दोन महिने वाहतुकीत बदल

खरातचं कुटुंब परदेशात पलायनाच्या तयारीत? पतीचे कोट्यवधींचे व्यवहार माहिती नाहीत, पत्नीची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT