milk 
पश्चिम महाराष्ट्र

दुधाला प्रति लिटर दहा रुपये अनुदानची मागणी... अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा इशारा

सकाळवृत्तसेवा

आटपाडी : आटपाडी तालुक्यात दुधाचे दर चौदा रुपयांनी कमी केले असून यामुळे पशुपालन व्यवसाय पूर्ण उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. राज्य शासनाने मागील सरकारच्या निर्णयाप्रमाणे दूध उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने प्रतिलिटर दहा रुपये अनुदान देऊन बळीराजाला वाचवावे. अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा इशारा राष्ट्रीय समाज पक्षाने दिला आहे.

आटपाडी तालुका राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुका अध्यक्ष लक्ष्मणराव सरगर,सरचिटणीस अजित खंदारे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी यासंबंधी महसूल विभागाला निवेदन दिले आहे. शेती पूरक व्यवसाय म्हणून शेतकरी पशुपालन व्यवसाय करतात. आटपाडी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अनेक तरुणांनी बँकांमधून कर्ज काढून पशुपालन व्यवसाय उभारला आहे. अनेक तरुणांच्या रोजगाराचे आणि उदरनिर्वाहाचे पशुपालन व्यवसाय मुख्य साधन आणि आधार बनला आहे.

कोरोणा साथीमुळे दूधाचे दर कमी केले आहेत. आटपाडी तालुक्यातील संघामधून शेतकऱ्यांना प्रति लिटर 34 रुपये मिळणारा दर वीस रुपये दिला जात आहे. प्रति लिटर 14 रुपये दर कमी केला आहे. दर कमी झाल्यामुळे वैरण, ओला चारा, पशुखाद्य, औषध उपचार हा सारा खर्चही या दुधाच्या पैशातून भागत नाही. त्यामुळे अनेक तरूण दुधाळ जनावरांची विक्री करू लागले आहेत. आटपाडी तालुक्यातील जिराईत शेतकऱ्यांचे जगण्याचे साधन बनलेला पशुपालन व्यवसाय उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.

मागील शासनात तात्कालीन दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांनी प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला होता. यावेळी त्या पेक्षा भयानक परिस्थिती असून शासनाने दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर दहा रुपये अनुदान द्यावे,अशी मागणी या निवेदनात केली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ammy Virk Attacked : कॉन्सर्ट संपवून घरी परतताना प्रसिद्ध गायक एमी विर्कच्या वाहनावर धडाधड गोळ्या झाडल्या; रोल्स रॉयसची केली चाळण

Amravati Hospital Fire: व्हेंटिलेटरच्या देखभालीअभावी तीन अर्भकांचा मृत्यू; अमरावती रुग्णालयातील पाच जण निलंबित

Pune Metro: पुणे मेट्रो लाइन ३ च्या उद्घाटनाचा मार्ग मोकळा; माण ते बालेवाडी पहिला टप्पा पूर्ण, पीएमओला अहवाल, कधी हाेणार सुरु?

Wani Crime : मायेने घरात ठेवले, घासातला घास दिला; त्याच भाडेकरूने जीव घेतला...!

Roasted Poha Namkeen: डाएट करताय? मग नक्की ट्राय करा कमी तेलातले 'रोस्टेड पोहा नमकीन'; वजन कमी करण्याच्या प्रयत्नात ठरेल फायदेशीर!

SCROLL FOR NEXT