helping hand.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

उत्तरकार्य विधी खर्च टाळून गरजूंना मदत : वडीलांना अनोखी श्रद्धांजली 

सकाळवृत्तसेवा

कोकरुड (सांगली)- शिराळा तालुक्‍यातील कोकरूड येथील माध्यमिक शिक्षक सुनील पाटील यांनी आपल्या वडिलांच्या उत्तरकार्य विधी प्रसंगी होणारा अनाठायी खर्च टाळून कोकरुड येथील स्वच्छता कर्मचारी, व गरजूंना जीवनावश्‍यक वस्तुंचे वाटप केले. या माध्यमातुन शिक्षक सुनिल पाटील आणि त्यांचे बंधू अनिल पाटील, विजय पाटील कुटुंबीयांनी त्यांचे वडील माजी मुख्याध्यापक आनंदा कृष्णा घोडे-पाटील यांनी अनोखी श्रद्धांजली वाहिली. आपत्तीच्या काळात अशा प्रकारे उपक्रम राबवून कुटुंबियांनी समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. 


कोरोनोचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने "लॉकडाऊन' जाहीर केला. त्याला शेतकरी, व्यापारी वर्गासह सर्वांचे सहकार्य लाभत आहे. मात्र प्रत्येक गावात रोजंदारीवर काम करणारे कुटुंबे, छोटे-छोटे व्यावसायिक यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या वेळेला केलेली मदत खऱ्या अर्थाने उपयोगी आणि सार्थक ठरेल या उदात्त हेतूने सामाजिक बांधिलकीची भान असणारे शिक्षक सुनिल पाटील यांनी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर वडीलांचे सर्व विधी घरगुती पद्धतीने करून गरजूंना मदत केली. 


दिवंगत ए.के. घोडे सर हे माजी सरपंच वृषाली पाटील यांचे सासरे होत. गावातील लोकांच्या अडीअडचणीला धावून जाणारे घोडे-पाटील कुटुंबिय अचानक वडीलांचे निधन झाल्यानंतरही गरजूंच्या मदतीला ते धावून आले. या त्यांच्या सामाजिक उपक्रमाबद्दल सामाजातून कौतुक होत आहे. 

घरगुती पद्धतीने विधी- 
आनंद घोडे सरांचे 6 एप्रिल रोजी निधन झाले. मात्र संचारबंदी असलेने घोडे-पाटील कुटुंबीयांनी पै-पाहुण्यांना फोन करून दहन विधीला न येण्याचे आवाहन केले. मोजक्‍याच लोकांच्या उपस्थितीत सोशल डिस्टन्सिंग राखून दहन विधी केला. तर तिसऱ्या दिवशी रक्षाविसर्जन केले. पाचव्या दिवशी दहावा आणि सातव्या दिवशी तेरावा असे घरगुती विधी करून नियमांचे पालन केले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jintur Accident : आईसोबत गजानन महाराजांच्या आरतीला गेलेल्या ७ वर्षीय निष्पाप चिमुकल्याचा अज्ञात क्रूझर वाहनाने दिलेल्या धडकेत दुर्दैवी मृत्यू

IND vs AFG : भारत-अफगाणिस्तान पहिल्या सामन्यावर संकट! दिल्ली पोलिसांचे पत्र अन् उडाली खळबळ; नेमकं काय घडलं?

Video: गार्गीला वाचवण्यासाठी गौतमी पाटीलची साद; सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाली, 'तिला मदत करा'

Ganesh Chaturthi 2026: गणपती बाप्पाला मोदकाचाच नैवेद्य का? जाणून घ्या मोदकामागचा खरा अध्यात्मिक अर्थ!

Pakistan Cricket : पाकिस्तानचे दोन सीनियर खेळाडू निघाले 'गद्दार'? सायबर क्राईमने पाठवले समन्स, लॉर्ड्स कसोटीत Fixing ची शंका

SCROLL FOR NEXT