सातारा : कोरोनाच्या संसर्गाचा मुकाबला करण्यासाठी 11 तालुका वैद्यकीय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहे. या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून वेळोवेळी नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी दिली आहे.
तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांचे नाव, कार्यालयीन दुरध्वनी व मोबाईल क्रमांक पुढील प्रमाणे. सातारा- डॉ. डी. जी. पवार 02162-231080, 9850802158.जावली – डॉ. बी. आर. मोहिते 02378-285427, 7743923902. महाबळेश्वर – डॉ. बी. आर. मोहिते 02168-261272, 7743923902. वाई- डॉ. एस. एम. यादव 02167-227841, 9403684588 व 8421039594. खंडाळा- डॉ. ए. पी. पाटील- 02169-252090,9421060017. फलटण- डॉ. व्ही. व्ही. पोटे 02166-225729, 9604455406. माण- डॉ. एल. डी. कोडाळकर 02165-220074, 9403684806 व 7875781610. खटाव- डॉ. वाय. आर. शेख 02161-231462,9403684786 व 9822896379. कोरेगाव- डॉ. आर. टी. जाधव 02163-220072, 9403684502 व 9657704502. कराड – डॉ. श्रीमती एस. सी. देशमुख 02164-224423,9423809055. पाटण- डॉ. आर. बी. पाटील 02372-282598, 9659571111.
शासकीय रुग्णालय, सातारा 02162-238494,230051, जिल्हा परिषद आपत्कालीन क्रमांक 02162- 233025 या दूरध्वनी क्रमांकावर तसेच राष्ट्रीय कॉल सेंटर क्र.91-11-23978046, राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्र.020-26127394, टोल फ्री हेल्पलाईन क्र.-104 व संपर्क साधून आपल्या शंकांचे निरसन करुन घ्यावे.
नागरिकांनी घरबसल्या तक्रार करावी
सातारा : पोलिस अधीक्षकांकडे तक्रार करण्याची आवश्यकता असलेल्या प्रकरणांमध्ये नागरिकांनी प्रत्यक्ष न येता मोबाईल किंवा ईमेलद्वारे तक्रारी नोंदविण्याचे आवाहन पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी केले आहे. यासाठी एक मोबाईल क्रमांकही नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आला आहे.
कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक योजनेचा भाग म्हणून नागरिकांनी एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्याचे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी काल केले. त्याचप्रमाणे नागरिकांनी आपले अर्ज व तक्रारी ऑनलाईन करण्याचे आवाहनही त्यांनी केले होते. त्यानुसार आज पोलिस दलानेही नागरिकांना पोलिस अधीक्षकांकडे प्रत्यक्ष तक्रारीसाठी न येता मोबाईल किंवा ईमेलवर तक्रारी करण्याचे आवाहन केले आहे. ज्या नागरिकांचे पोलिस ठाण्याच्या स्तरावर किंवा पोलिस उपअधीक्षक कार्यालयाच्या पातळीवर तक्रारींचे समाधान होत नाही. ते पोलिस अधीक्षकांकडे तक्रार करत असतात. अशा नागरिकांनी आता प्रत्यक्ष पोलिस मुख्यालयात यायचे नाही. त्यांना तक्रारी करण्यासाठी 9373920530 या मोबाईल क्रमांकावर फोनद्वारे, मेसेज द्वारे किंवा व्हॉट्सऍपद्वारे सकाळी 10.00 ते सायंकाळी सहापर्यंत संपर्क करायचा आहे. त्याचप्रमाणे नागरिक आपल्या तक्रारी spsatara.visitor@gmail.com या मेलआयडीवरही मेल करू शकतात.
याशिवाय नागरिकांसाठी नियंत्रण कक्षाचे 100, 02162-233833, मोबाईल क्रमांक 9011181888, महिलांसाठी- 1091, ज्येष्ठ नागरिकांसाठी - 1090, असे पोलिस मदत केंद्राचे संपर्क क्रमांक 24 तास उपलब्ध असणार आहेत. पत्राद्वारेही नागरिक संपर्क करू शकतात. तक्रारीचे तत्काळ कायदेशीर निरसन केले जाणार आहे. मुख्यालय पातळीबरोबरच पोलिस उपअधीक्षक कार्यालय, तसेच पोलिस ठाण्याच्या स्तरावरही अशाच प्रकारे अभ्यागत यंत्रणा राबविणेबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी प्रत्यक्ष कार्यालयात न येता वरील सुविधांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
मांसाहारींच्या जिव्हाळ्याच्या वारुगड व मोहीच्या जत्रा रद्द
दहिवडी : उन्हाळ्याची चाहूल लागली की गावोगावच्या यात्रा-जत्रांना सुरुवात होते. मात्र यंदा 'करोना' विषाणूमुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाच्या आवाहनाला साथ देत या यात्रा-जत्रा रद्द करण्यात येत आहेत. माण तालुक्यातील मोठ्या यात्रा-जत्रा म्हणून ओळख असणार्या शिखर शिंगणापूर येथील श्री शंभू महादेवाची यात्रा रद्द केल्यानंतर आज मांसाहारींच्या जिव्हाळ्याच्या वारुगड येथील श्री काळभैरवनाथ व मोही येथील श्री महालक्ष्मी या जत्रा रद्द करण्यात आल्या आहेत.
'करोना' विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाने आवाहन केल्यानंतर यात्रा समितीच्या बैठकींमध्ये दोन्ही गावातील प्रतिष्ठित नागरिक, सरपंच, पोलीस पाटील यांनी एकत्र येत एक मुखाने जत्रा रद्द करीत असल्याबाबत ठराव केले. माण तालुक्यातील प्रसिद्ध अशा या दोन्ही जत्रांसाठी महाराष्ट्राच्या विविध भागातून विशेषत: मुंबई, पुणे येथून मोठ्या प्रमाणावर भाविक सहकुटुंब सहपरिवार येत असतात. तसेच ते सर्वजण जत्रेच्या मुख्यदिवसासोबत दोन-चार दिवस जत्रेच्या परिसरात राहतात. त्यातही या जत्रा मांसाहारींमध्ये विशेष प्रसिद्ध असल्याने खवैय्यांची मोठी गर्दी या ठिकाणी होत असते.
शाब्बास रे पठ्ठया ! चालत्या ट्रेनमधून उडी मारुन चाेरट्यास पकडले
परंतू 'करोना' विषाणूच्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर सदर गावांमधील जत्रा रद्द करण्याबाबतच्या बैठका आज सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या उपस्थितीत घेण्यात आल्या. या बैठकीत या जत्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. जत्रेस परगावाहून कोणीही येऊ नये. जत्रेच्या दरम्यान तिथीनुसार असणारे सर्व धार्मिक कार्यक्रम हे केवळ पुजाऱ्यांमार्फत केले जाणार आहेत. त्यामुळे यात्रा कमिटी व प्रशासन यांना सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.