akole yatara 
पश्चिम महाराष्ट्र

video : येथे असतो विस्तव डान्स... बघा लय डेंजरय

शांताराम काळे

अकोले: तालुक्‍यातील जामगाव येथे ग्रामदैवत गवळी बाबाचा यात्रोत्सव भरतो. चिंचवणे येथेही यात्रा भरते. या दिवशी दुपारी चार वाजता फुलांनी सजवलेल्या सुमारे 80 फूट उंच असणाऱ्या काठीची गावातून सवाद्य मिरवणूक निघते. पारंपरिक वाद्यांच्या तालावर लेझीम पथक आपली कला सादर करतात. गावातील अबालवृद्ध ही काठी अंगाखांद्यावर घेत नाचवतात.

काठीची मिरवणूक गवळी बाबा मंदिरासमोर आल्यानंतर काठीचा मंदिराच्या गाभाऱ्यातील समाधीला स्पर्श होतो. आणि भक्तांचा हुई हुईचा चित्कार सुरु होतो. याच वेळी टाळ मृदंगाच्या गजरात गावातील प्रत्येक वाड्यातील वीर मंदिरासमोर असणाऱ्या होळीभोवती फेर धरतात. त्यांच्या पाठोपाठ चित्कार करणारे भक्त धगधगत्या निखऱ्यावर हे भक्त देहभान विसरून नाचतात. हा अनोखा सोहळा पाहण्यासाठी परिसरातील नागरिक आवर्जून येथे भेट देतात. 

नवसासाठी डोक्‍यावर दगड 
गेल्या अनेक वर्षांपासून हा उत्सवसुरू आहे. भक्तांची ही तिसरी पिढी आहे. चिंचवणे येथेही ग्रामदैवतांची यात्रा भरते. या दिवशी मंदिरासमोर मोठी शिळा भाविक नवस फेडण्यासाठी डोक्‍यावर घेतात. या वर्षी खेमा डगळे यांच्यासह 25 भाविकांनी डोक्‍यावर दगड उचलून नवस फेडला. आपल्या ग्रामदेवताप्रति असणारी श्रध्दा जपत सर्व ग्रामस्थ एकजुटीने हा उस्तव साजरा करत असल्याचे उपसरपंच प्रकाश महाले यांनी सांगितले. 

गावातील भक्तांबरोबर राजूर व इतर गावांतील भक्तही यात सामील झाले होते. कुठलाही पोलीस बंदोबस्त न घेता शांततेच्या मार्गाने मिरवणूक संपन्न झाली. यावेळी उपस्थितांचे आभार सरपंच उषा पारधी, पोलीस पाटील गीताराम महाले यांनी मानले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT