Heroic Father Ganpati Chougule Says My Son Was Brave 
पश्चिम महाराष्ट्र

बापाचे डोळेच बोलले... मुलगा माझा कर्तृत्ववान ! 

अजित माद्याळे

गडहिंग्लज ( कोल्हापूर ) - दु:ख आणि आनंदाच्या प्रसंगात काही लोक निशब्द होतात. अशावेळी केवळ चेहरा आणि डोळेच बोलतात. गडहिंग्लज तालुक्‍यातील उंबरवाडीचे शहीद जवान जोतिबा चौगुले यांचे वडील गणपती चौगुले यांच्या पाणावलेल्या डोळ्यांकडे पाहून आज ही घटना प्रत्यक्ष अनुभवण्यास मिळाली. एकीकडे पोटचा गोळा गेल्याचे दु:ख आणि दुसऱ्या बाजूला देशसेवेसाठी प्राणाची आहुती दिलेल्या मुलाच्या कर्तृत्वाचा अभिमान असा दुहेरी डाव नियतीने त्यांच्या आयुष्यात मांडला आहे. दु:खाचा दगड काळजावर ठेवत गणपती यांनी डोळ्यांद्वारे व्यक्त केलेल्या नि:शब्द भावनेतून मुलाच्या कर्तृत्वाचा अभिमान झळकताना पाहून उपस्थितांचाही ऊर भरून आला. 

पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात उंबरवाडीचा जवान जोतिबा चौगुले शहीद झाल्याचे वृत्त पसरताच उंबरवाडी, महागावसह जिल्हाच नव्हे तर राज्य हळहळले. जोतिबा शहीद झाल्याची बातमी वडील गणपती, भाऊ रजत व मामा आनंदा गोरूले यांनाच कल्पना होती. आज दुपारी वडील गणपती यांच्या भावना जाणून घेण्यासाठी उंबरवाडीतील चौगुले यांचे घर गाठले; परंतु आईला या घटनेची माहिती न दिल्याने घराकडे कोणालाच पाठवून दिले जात नव्हते. म्हणून गणपती यांना शेजारच्या घरी बोलावून भेट घेतली. खिन्न मनाने बसलेल्या गणपती यांची भिरभिरती नजर केवळ मुलाकडेच होती. मुलाच्या कर्तृत्वाबद्दल त्यांना प्रश्‍न केला असता लहानपणापासून तो जिद्दी आणि देशासाठी काही तरी करून दाखवण्याची हिमत बोलून दाखवायचा अशा मोजक्‍या शब्दातच त्यांनी उत्तर दिले. जोतिबा सैन्यदलात भरती झाल्यानंतर काहीच महिन्यांनी सैन्यात दाखल झालेले त्याचे मित्रही जोतिबा यांच्याबरोबरच्या आठवणी सांगत त्यांचाही कंठ दाटून येत होता. 

मामा म्हणाले जोतिबा सैन्यात जायची स्वप्ने पाहायचा

महागावात तेली गल्लीतील ज्यांच्या घरी जोतिबा लहानाचे मोठे झाले, ते महागावचे मामा आनंदा गोरूले दु:ख सावरतच भाच्याच्या अंत्यविधीच्या तयारीत ग्रामस्थांसोबत व्यस्त होते. त्यांना तेथेच बोलते केले. ते म्हणाले, ""जोतिबा नेहमी सैन्यात भरती होण्याची स्वप्ने पहायचा. बारावी झाल्यानंतर लगेचच बेळगाव येथे सैन्यदलात भरती झाला. जोतिबाचे वडील मुंबईत कामाला होते. उंबरवाडीत छोटेसे घर आणि जिरायत शेती. पावसाच्या भरवश्‍यावरच शेतीतून उत्पन्न मिळायचे. खडतर परिस्थितीतून जोतिबा शिकला आणि देशसेवेसाठी दाखल झाला. निर्व्यसनी असलेल्या जोतिबाचा मित्रपरिवार मोठा आहे. सुट्टीवर आल्यानंतर वेगवेगळ्या सार्वजनिक कामात पुढाकार घ्यायचा. जोतिबा नोकरीला लागल्यापासूनच आई-वडीलांच्या नशीबी सुखाचे चार दिवस आले; परंतु हे सुख पाहण्यासाठी आता तोच राहिला नाही, याचेच दु:ख आहे. 

सात महिन्यांवर होती निवृत्ती 

जोतिबा 2002 मध्ये सैन्यात भरती झाले. दक्षिण अफ्रिकेतील साऊथ सुदान येथे कमांडोचे प्रशिक्षण घेत दोन वर्षे शांतीदूत म्हणून सेवा बजावली. दिवाळीच्या सुट्टीत ते आले होते. त्यांच्या सेवानिवृत्तीला सात महिने शिल्लक होते. निवृत्तीनंतर गावी येऊन काय-काय करायचे, याचे नियोजनही त्यांनी बोलून दाखविले होते असे त्यांचे मामा गोरूले यांनी 'सकाळ'ला सांगितले. त्यांची पत्नी यशोदा या मुलांच्या शिक्षणानिमित्त गडहिंग्लजमध्ये वास्तव्याला आहेत. चौगुले दाम्पत्याला तिसरीत शिकणारा अथर्व व तीन वर्षाचा हर्षद अशी दोन मुले आहेत. पत्नी यशोदा यांनाही मंगळवारी रात्रीपर्यंत या घटनेची माहिती दिली नव्हती.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT