HHT System to TC in Railways CHART boycatt for TICKET INSPECTIONS miraj sakal
पश्चिम महाराष्ट्र

रेल्वेत ‘टीसीं’कडे ‘एचएचटी’ प्रणाली; तिकीट तपासणींचा चार्ट बंद

तिकीट तपासणींचा चार्ट होणार कायमचा बंद; प्रतीक्षा यादीवरील प्रवाशांनाही फायदा

शंकर भोसले

मिरज : कोल्हापूर-मुंबई (महालक्ष्मी) आणि मिरज-गोवा (निजामुद्दीन एक्स्प्रेस) या रेल्वेगाड्यांमध्ये तिकीट तपासनीसांकडे एचएचटी (हॅण्ड होल्ड टर्मिनल) सुविधा देण्यात आली आहे. या सुविधेमुळे तिकीट तपासनीसांकडील प्रवासी माहिती संकलन चार्ट बंद होणार आहे. या प्रणालीद्वारे लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रतिक्षा यादीतील प्रवाशांना बर्थ रिकामी झाल्यावर त्याची माहिती मिळणार आहे. तिकीट तपासनीसांकडून प्रत्येक स्थानकावर कोणती बर्थ रिकामी झाली आहे, याची माहिती या प्रणालीद्वारे रेल्वे यंत्रणेला कळवावी लागणार आहे. त्याचा फायदा प्रतिक्षा यादीवर राहिलेल्या प्रवाशांना होईल.

मिरज स्थानकातून लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये ड्युटीवर असलेल्या ३६ तिकीट तपासनीसांकडे एचएचटी प्रणाली यंत्र देण्यात आले आहे. रेल्वेतून लांब पल्ल्याचा प्रवास करताना अचानक तिकीट ‘कन्फर्म’ न झाल्यास प्रवासाचा बेत रद्द किंवा अन्य वाहनांनी करावा लागत असल्यामुळे प्रवाशांना अडचणी निर्माण होतात. मात्र या प्रणालीअंतर्गत तिकीट तपासनीसांकडे मोबाईल, टॅबसारखी एचएचटी प्रणाली देण्यात आली आहे. गाडीत बर्थ रिकामी झाल्यास प्रवाशांना याची माहिती मिळणार आहे. ही सुविधा महालक्ष्मी एक्स्प्रेस व निजामुद्दीन-गोवा एक्स्प्रेस या दोन्ही गाड्यांना सुरू करण्यात आली आहे. मिरज विभागातील ३६ तिकीट तपासनीसांकडे हे यंत्र देण्यात आले आहे.

यामध्ये गाडीमधील प्रवासी आरक्षणाची संपूर्ण माहिती असणार आहे. तिकीट तपासनीसांना आरक्षित चार्ट घेणे बंधनकारक असणार नाही. सध्या मिरजेतून सुटणाऱ्या एक्स्प्रेस गाड्यांना ही सुविधा असणार आहे.

...या गाड्यांना ‘एचएचटी’ सुविधा

सध्या मिरजेतून धावणाऱ्या कोल्हापूर-मुंबई आणि मुंबई-कोल्हापूर (महालक्ष्मी एक्स्प्रेस), तसेच मिरजेतून गोव्याकडे जाणाऱ्या निजामुद्दीन-गोवा एक्स्प्रेस गाड्यांमध्ये एचएचटी प्रणाली यंत्र तिकीट तपासनीसांकडे देण्यात आले आहे. तसेच मिरजेतून धावणाऱ्या अन्य २५ एक्स्प्रेस गाड्यांमध्येही ही सुविधा देण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune: राजकारणात मोठा ट्विस्ट! काकांनी नाकारलं; पवार–शिंदे युतीमुळे नवं समीकरण तयार होणार? पुण्यात पडद्यामागे घडामोडी

Smith Surpasses Dravid: ऑस्ट्रेलिया 'बॉक्सिंग डे' टेस्ट हरले, पण कर्णधार स्मिथने द्रविड-कोहलीला मागे टाकत रचले मोठे विक्रम

Nagpur Municipal Election : ...तर एकत्र लढणार ‘महाविकास आघाडी’; काँग्रेसकडून ३२ जागा सोडण्याची शक्यता

Viral Video: विराट कोहलीचा व्हिडिओ काढण्यासाठी एका ड्रायव्हरने लढवली अनोखी शक्कल, नेटकरी म्हणाले...

Crime News : 'पीडितेने जबाब बदलला तरीही...' मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या पित्याला हायकोर्टाचा मोठा झटका

SCROLL FOR NEXT