पश्चिम महाराष्ट्र

पोलंडचे उच्चायुक्त, राजदूत उद्यापासून कोल्हापूर दौऱ्यावर

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पोलंड देशातील निर्वासितांना चार वर्षे आधार आणि आसरा दिलेले कोल्हापूर आहे तरी कसे?, हे पाहण्यासाठी पोलंडचे उच्चायुक्त डेमियन आयरझिक व राजदूत ॲडम बुरोकोस्की सोमवारपासून (ता. २५) दोन दिवस कोल्हापुरात आहेत. 

ज्या ठिकाणी पोलंड निर्वासितांची छावणी होती, त्या वळिवडे (ता. करवीर) येथील छावणीच्या अस्तित्वात असलेल्या परिसरालाही ते भेट देणार आहेत. आपल्या देशवासीयांना आधार दिलेल्या  कोल्हापूरविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे दोन वरिष्ठ अधिकारी तर उद्या येणारच आहेत, पण विश्‍वनीय माहितीनुसार खुद्द पोलंडचे राष्ट्राध्यक्षही येत्या दोन-तीन महिन्यांत कोल्हापुरात येणार आहेत. १९४२ ते ४८ या काळात महायुद्धाची सर्वाधिक झळ बसलेल्या पोलंड देशातील नागरिकांना भारतातील काही गावांत निवाऱ्यासाठी आणले होते. 

ते येथे येणार म्हटल्यावर करवीर संस्थानने शहरालगतचे व महामार्गालगतचे व रेल्वेस्थानकालगतचे सुरक्षित ठिकाण म्हणून वळिवडे (सध्याचा गांधीनगर परिसर) येथे मोकळी जागा निवडली. तेथे प्रत्येकी दोन खोल्या व्हरांडा अशी चाळीसारखी कौलारू वसाहत उभी केली. पाणी, खेळासाठी मैदान, तात्पुरते चर्च, पोस्ट, खुले सिनेमागृह, आरोग्य केंद्र, प्रोव्हिजनल स्टोअर्स, शाळा अशा तात्पुरत्या सुविधाही उपलब्ध करून दिल्या. या ठिकाणी पोलंडवासियांना रेल्वेतून आणले. जवळजवळ चार वर्षे या ठिकाणी पोलंडवासीय रहात होते. त्यात बहुतेक स्त्रिया, लहान मुले मुली व जेष्ठ नागरिकच होते. इथल्या वास्तव्याच्या काळात ८० निर्वासित आजारपण, वृद्धावस्था यामुळे मरण पावले. त्यांच्यासाठी संगम टॉकीजच्या पिछाडीस दफनभुमी उभी करण्यात आली. दोन वर्षापुर्वी पोलंडवरून आलेल्या १० इंजिनिअर्सनी स्वतः श्रमदान करून या दफनभुमीची डागडुजी केली.

वळिवडे कॅम्पसह अनेक ठिकाणी भेटी देणार
आता तर खुद्द पोलंडचे भारतातील उच्चायुक्त डेमियन व राजदूत ॲडम, रॉबर्ट डेडेझिक व श्रीमती इवा स्टॅनक्‍यु कोल्हापुरात येऊन वळिवडे कॅम्प, संगम टॉकीजच्या मागची दफनभूमी, महावीर उद्यानातील स्मृती स्मारक, सेंट झेव्हियर हायस्कूल, नवीन राजवाडा येथे भेट देणार आहेत. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पोलंड व भारताचे मैत्रिपूर्ण संबंध अधिक वृद्धिंगत होण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. त्यानुसार उद्या वरिष्ठ पातळीवर अधिकाऱ्यांची पहिली भेट आहे. त्यानंतर खुद्द पोलंडचे राष्ट्राध्यक्षच कोल्हापुरात येणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT