turmeric.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

सांगलीत मुहूर्ताच्या हळदीला 11 हजार 200 रूपये उच्चांकी दर 

घनश्‍याम नवाथे

सांगली- येथील सांगली कृषि उत्पन्न बाजार समितीतर्फेआज नविन हळद शेतीमाल सौदयाचा प्रारंभ सभापती दिनकर पाटील यांच्याहस्ते करण्यात 
आला. मुहूर्ताच्या सौद्यात राजापुरी हळदीला 11 हजार 200 रूपये क्विंटल इतका जास्तीत जास्त दर मिळाला. 

नविन हळद सौद्याचा प्रारंभ मे.गणपती जिल्हा कृषि औद्योगिक सहकारी सोसायटी या दुकानातून झाला. जय श्रीराम टेडींग कपंनी या दुकानामधील हळद सौद्यामध्ये बावची (ता. वाळवा) येथील शेतकरी सतीश कोकाटे यांच्या राजापूरी हळदीला क्विंटलल 11 हजार 200 रूपये इतका उच्चांकी दर मिळाला. सदरची हळद मनाली ट्रेडींग कंपनी यांनी खरेदी केलेली आहे. आजच्या मुहूर्ताच्या हळद सौद्याठी क्विंटलला कमीत कमी पाच हजार रूपये व जास्तीत जास्त 11 हजार 200 रूपये इतका दर मिळाला आहे.

मुहूर्ताच्या हळद सौद्यासाठी व्यापारी प्रतिनिधी संचालक शितल पाटील, मुजीर जांभळीकर, हमाल प्रतिनिधी संचालक बाळासाहेब बंडगर, संचालक जीवन पाटील, व्यापारी मनोहरभाई सारडा, गोपाळ मर्दा, माजी महापौर सुरेश पाटील, सत्यनारायण अटल, मधूकर काबरा, राजेंद्र मेणकर, हमाल पंचायतीचे विकास मगदूम, बाजार समितीचे प्र.सचिव आर. ए. पाटील, हळद सोदे विभाग 
प्रमुख एम. के. रजपूत आदींसह आडते, व्यापारी, हमाल, तोलाईदार व शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते. बाजार समितीमध्ये होणाऱ्या सौद्यासाठी शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त हळद आणावी असे आवाहन सभापती पाटील व प्रभारी सचिव पाटील यांनी केले. 


"" बाजार समिती सांगली येथे शेतकऱ्यांनी हळद व बेदाणा घेऊन यावा. शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या शासनाच्या हळद/बेदाणा शेतमाल तारण कर्ज योजनेचा लाभ घ्यावा.'' 
-सभापती दिनकर पाटील (बाजार समिती सांगली) 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मला मतदान करू नका म्हणणारे अपक्ष गोकुळ गिते आघाडीवर; शिंदेंचा उमेदवार म्हणाला, महायुतीने घात केला, सगळे गद्दार

मुंबईसह उपनगरात जोरदार पावसाची हजेरी, पुढील ३ तास अतिमुसळधार पावसाचा इशारा

India-Russia: रशियाकडून कच्च्या तेलाची विक्रमी आयात; आखाती देशातील तणावामुळे भारताची नवी रणनिती

Latest Marathi News Live Update : परभणी-हिंगोलीत महायुतीचा उमेदवार विजयी, मविआच्या उमेदवाराचा पराभव

Girish Mahajan : 'वडील हयात नाहीत, तिच्या लग्नाची जबाबदारी माझ्यावर'; 'त्या' वादग्रस्त फोटोबाबत मंत्री महाजनांचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT