khapli.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

मुहूर्ताच्या नविन खपली सौद्यात सात हजार रूपये उच्चांकी दर 

घनश्‍याम नवाथे

सांगली-  येथील कृषि उत्पन्न बाजार समितीतर्फे आज नविन खपली शेतीमाल सौदयाचा प्रारंभ व्यापारी प्रतिनिधी संचालक मुजीर जांभळीकर यांच्याहस्ते करण्यात आला. मुहूर्ताच्या सौद्यात खपलीला क्विंटलला 7 हजार रूपये इतका उच्चांकी दर मिळाला. 

नविन खपली सौद्याचा प्रारंभ मे. आण्णाप्पा हालुंडे व आप्पासो दादा पाटील या दुकानातून झाला. नविन खपली सौद्यामध्ये शेतकरी सुभाष चौगुले (रा. चिक्कोडी ता.रायबाग) व पिंटू बेल्लद (रा.बागेवाडी ता. हक्केरी) यांच्या खपलीला क्विंटलला सात हजार रूपये इतका जास्तीत जास्त दर मिळाला. सदरची खपली महादेव माने, रेणूका इंडस्ट्रीज, राहूल पाटील, अनिल पाटील, योगेश दडगे, आर. टी. कुंभार यांनी खरेदी केली आहे. नविन खपली सौद्यात क्विंटलला कमीत कमी 6 हजार 500 रूपये आणि जास्तीत जास्त 7 हजार रूपये इतका दर मिळाला आहे.

सौद्यासाठी व्यापारी प्रतिनिधी संचालक शितल पाटील, श्री. जांभळीकर, आडते/व्यापारी प्रमोद चौगुले, सिध्दू दलाल, लक्ष्मण दलाल, महेश झंवर, उमेश कुंभार, बंडू दलाल, बाजार समितीचे प्रभारी सचिव आर. ए. पाटील तसेच अडते, व्यापारी, हमाल, तोलाईदार व शेतकरी उपस्थित होते. दरम्यान खपली उत्पादक शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त खपली बाजार समितीमध्ये विक्रीसाठी घेऊन यावे. तसेच शेतकऱ्यांसाठी चालू असणाऱ्या शासनाच्या हळद /बेदाणा शेतमाल तारण कर्ज योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन सभापती दिनकर पाटील व सचिव श्री. पाटील यांनी केले आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PNG Gas Connection : गॅस सिलिंडरचं टेन्शन मिटलं ! आता २४ तासांत मिळेल PNG कनेक्शन, घरबसल्या 'असा' करा अर्ज

RCB चा माजी खेळाडू झाला पुन्हा बाबा; दोन जुळ्या मुलानंतर घरी आली परी

Hindu Nav Varsh: असा मराठी राजा, ज्याचा विजय साजरा करण्यासाठी गुढी उभारण्याच्या प्रथेला झाली सुरुवात; जाणून घ्या इतिहास

Latest Marathi News Live Update : डोणगावमध्ये खंडोबा मंदिरावर वीज कोसळली

Gold Rate Today: गुढीपाडव्याच्या शुभमूहर्तावर सोन्याच्या भावात मोठी घसरण! सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा; पाहा आजचा ताजा भाव

SCROLL FOR NEXT