highway is dangerous to leopard in sangli two leopard dead in accident in sangli 
पश्चिम महाराष्ट्र

महामार्ग ठरतोय बिबट्यांच्या अस्तित्वासाठी संकट ; सात महिन्यांत दोन माद्या ठार

विजय लोहार

नेर्ले (सांगली) : येथील आशियायी महामार्ग बिबट्यासाठी कर्दनकाळ बनला आहे. वाळवा तालुक्‍यातच मागील सात महिन्यांत महामार्गावर अज्ञात वाहनांच्या धडकेने केदारवाडी व इटकरे येथे दोन बिबट्यांचा बळी घेतला. याबाबत वन विभागाची भूमिका उदासीन आहे. वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी होते.

एकीकडे कृष्णा काठ व महामार्गालगत असणारे शेतकरी गवे, बिबट्याच्या वावराने भयभीत होत आहेत; तर दुसरीकडे वाहनांमुळे बिबट्यांचे अस्तित्व नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचे दुहेरी चित्र दिसून येत आहे. आशियायी महामार्गावर मागील २७ जुलैला केदारवाडीजवळ देसाई मळ्याजवळ एक वर्षांचा मादी बिबट्या ठार झाला. हा प्राणी काळमवाडीच्या दिशेने शेतातून कासेगावकडे जाणाऱ्या सेवा रस्त्यावर आला. रात्री दहाच्या सुमारास तो महामार्गावर आल्यानंतर कोल्हापूरहून येणाऱ्या अज्ञात वाहनाची धडक त्याला बसली.

बिबट्या धडपडत सेवा रस्त्यावरच्या झाडीत येऊन पडला. यात त्याच्या पोटाला, तोंडाला मार लागून कानातून रक्त आले. यातच त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर काल (ता. २९) इटकरे येथे रात्री अपघातात बिबट्या ठार होण्याची ही दुसरी घटना आहे. विशेष म्हणजे ठार झालेल्या दोन्ही माद्या होत्या.

यामुळे आशियाई महामार्ग हा वन्य प्राण्यांसाठी मृत्यूचा मार्ग ठरत असल्याचे चित्र आहे. यासाठी वन विभागाने ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे. लोकवस्तीत विविध ठिकाणी वन्य जीव भटकताना दिसून येत असतानाच, गेल्या बिबट्यांचा असा नाहक मृत्यू झाल्यामुळे प्राणीमित्रांनी हळहळ व्यक्त केली आहे. मागील महिन्यात महामार्गावर एका कोल्ह्याचाही अपघाती मृत्यू झाल्याची नोंद आहे.

वन विभागात उदासीनता

वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांत याबाबत कमालीची उदासीनता दिसून येत आहे. वाळवा व शिराळा तालुक्‍यातील महामार्ग व कृष्णा नदीच्या काठावरील गावांतील शेतात बिबट्याचा वाढता वावर आहे. याबाबत काहीच ठोस पावले उचलली जात नाहीत. वरिष्ठांनी लक्ष घातल्यास बिबट्याचे अस्तित्व वाचेल व लोकांचेही संरक्षण होईल.

अधिवासासाठी ऊस पिकाची निवड 

बिबट्या हा चपळ आणि चलाख बुद्धीचा प्राणी आहे. जंगलात राहणं त्याला आवडतं. परंतु, जंगलात एखादी शिकार केल्यावर ती शिकार रानकुत्री अथवा वाघ पळवून नेतात. या वेळी संघर्षात बिबट्याचा जीवही जातो. त्याने आता मानवी वस्तीशी निगडित राहून ऊस या पिकाची संरक्षणासाठी निवड केली आहे. यामुळे शेतकरी आणि बिबट्या यांचा संघर्ष परिसरात पाहायला मिळतो.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Shirsat: अंबादास दानवेंनी लावलेली आग अन् फडणवीसांनी केलेला गेम, संजय शिरसाट कसे फसले?

Latest Marathi News Updates : पुण्यात महिलेच्या सूपमध्ये सापडले झुरळ

Pratap Sarnaik: आता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर बसणार कारवाईचा चाप, परिवहन मंत्र्यांचे निर्देश

मराठी नाट्य परिषदेतर्फे खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचं आयोजन; कुठे कराल अर्ज? वाचा नियम व अटी

API Duty: आता उपचार स्वस्त होणार! औषधांच्या किमतीबाबत सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, कुणाला फायदा?

SCROLL FOR NEXT