Police-Bandobast Sakal
पश्चिम महाराष्ट्र

कर्नाटकातील हिजाब प्रकरणाचे बेळगावात पडसाद, पोलिस बंदोबस्तात वाढ

हिजाब प्रकरणाने संपूर्ण राज्य ढवळून निघाले आहे. आता याचे पडसाद बेळगावात देखील उमटू लागले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

हिजाब प्रकरणाने संपूर्ण राज्य ढवळून निघाले आहे. आता याचे पडसाद बेळगावात देखील उमटू लागले आहेत.

बेळगाव - हिजाब प्रकरणाने (Hijab Case) संपूर्ण राज्य ढवळून निघाले आहे. आता याचे पडसाद बेळगावात (Belgaum) देखील उमटू लागले आहेत. येथील जोती महाविद्यालयात देखील विद्यार्थ्यांनी (Student) गळ्यात भगवे शाल घालून प्रवेश केला. मंगळवार (ता. ८) याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून सर्व ग्रामीण भागात पोलीस बंदोबस्तात (Police Bandobast) वाढ करण्यात आली आहे.

गेल्या आठ दिवसापासून हिजाब वरून राज्यात घमासान सुरू आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी आणि विद्यार्थिनी हिजाबच्या विरोधात गळ्यामध्ये भगवे शाल परिधान करून शाळा-महाविद्यालयांना येत आहेत. त्यामुळे काही ठिकानी तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कलम १४४ नुसार जमावबंदी देखील लागू करण्यात आली आहे.

हे प्रकरण चिघळू नये यासाठी मंगळवार (ता.८) मुख्यमंत्री बसवराज मुंबई यांनी बुधवार पासून तीन दिवस राज्यातील शाळा महाविद्यालय बंद ठेवण्याचा आदेश बजावला आहे. त्यातच हिजाबचे लोन बेळगाव पर्यंत येऊन पोहोचले आहे. येथील ज्योती महाविद्यालयात आज विद्यार्थ्यांनी गळ्यात भगवे शाल परिधान करून प्रवेश केला. त्यामुळे काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून याप्रकरणाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. कायदा व सुव्यवस्था या दृष्टीकोनातून पोलीस खात्याच्या वतीने शहरात खडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CISF जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार, असिस्टंट कमांडंटसह ४ जवानांचा मृत्यू

Vani News : सासरी होणाऱ्या मानहानी अन् छळाला कंटाळून तरुणाने संपविले जीवन; स्टेटसवर व्हिडिओ ठेवत उघड केला प्रकार

Japanese Encephalitis Virus: आसाममध्ये डासांमध्ये जपानी मेंदूज्वराचा जी-१ विषाणू प्रथमच आढळला; ‘एनआयव्ही’ पुण्याचे संशोधन अमेरिकन जर्नलमध्ये प्रकाशित

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

SCROLL FOR NEXT