Hindus' office burst by thieves
Hindus' office burst by thieves 
पश्चिम महाराष्ट्र

वर्दळीच्या ठिकाणचे "हिंदुजा' फोडले

सकाळ वृत्तसेवा

नगर : तारकपूर बसस्थानकासमोरील प्रेरणा आर्केडमध्ये असलेले हिंदुजा लेलॅंड फायनान्स कंपनीचे कार्यालय फोडून, तिजोरी उचलून नेऊन चोरांनी दोन लाख 80 हजार रुपये लांबविले. पोलिसांकडून श्‍वानपथकाला पाचारण करून शोध घेण्यात आला; पण श्‍वानाने रस्त्यापर्यंतच माग काढला. याबाबत शाखा व्यवस्थापक रावसाहेब वालझोडे (हिंदुजा लेलॅंड फायनान्स) यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला. 

गेल्या दोन दिवसांपासून सावेडी उपनगरामध्ये घरफोड्या सुरू आहेत. काल चोरांनी नगर-मनमाड रस्त्यावरील टायरचे शो-रूम व दोन दुकाने फोडून मुद्देमाल लांबविला, तर दोन दुकाने फोडण्याचा प्रयत्न केला. ही घटना ताजी असतानाच बुधवारी मध्यरात्री चोरांनी तारकपूर बसस्थानकासमोरील प्रेरणा आर्केडमध्ये असलेले हिंदुजा फायनान्स कार्यालयाचे कुलूप तोडून चोरी केली. 

तिजोरी उचलून नेली 
दुकानात ठेवलेली तिजोरी चोरांनी उचलून समोरील मोकळ्या जागेत नेली. तेथे तिजोरी तोडून आतील दोन लाख 80 हजार रुपये लांबविले, तर अन्य कागदपत्रे जागेवरच टाकून पलायन केले. ही घटना आज सकाळी कर्मचारी आल्यानंतर उघडकीस आली. त्यांनी तत्काळ तोफखाना पोलिसांना माहिती दिली. पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल झाले. तत्काळ श्‍वानाला पाचारण करून आरोपींचा शोध घेतला. मात्र, श्‍वानाने केवळ रस्त्यापर्यंत माग काढला. त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस पथकही घटनास्थळी दाखल झाले. 
 

हाकेच्या अंतरावर फोडली तिजोरी 
चोरांनी दुकानातून अगदी हाकेच्या अंतरावर तिजोरी उचलून नेली. तेथे ती फोडून आतील मुद्देमाल लांबविला. ही चोरी माहीतगार व्यक्तीनेच केली असावी; कारण अत्यंत आडबाजूला असलेले कार्यालय आणि तेथे रोकड असल्याची माहिती चोरांना असावी, असा अंदाज वर्तविला जात आहे. 

गस्त कुचकामी 
तारकपूर बसस्थानकावर चार दिवसांपूर्वी एका बसवर दगडफेक करून चालकाला बेदम मारहाण करण्यात आली होती. त्या वेळी पोलिसाला धक्काबुक्की झाली होती. ही घटना ताजी असतानाच तारकपूर बसस्थानकासमोरील दुकान अज्ञात चोरांनी फोडले. त्यामुळे पोलिसांचे गस्त घालणारे वाहन नेमके कोठे फिरते, असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. 
  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: अर्धशतकवीर पोरेलपाठोपाठ ऋषभ पंतही झाला बाद, दिल्लीचा निम्मा संघ परतला माघारी

राज्यसेवेला वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच; बदल करण्याचा MPSCचा कुठलाही मानस नाही

Russia : पुतिन यांनी पाचव्यांदा घेतली रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ; आता पेलावी लागणार 'ही' आव्हाने

Latest Marathi News Live Update : PDCC बँकेवर आचारसंहिता भंगप्रकरणी गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT