On his birthday he was born again 
पश्चिम महाराष्ट्र

वाढदिवशीच झाला त्याचा पुनर्जन्म

अमोल वाघमारे

सावळीविहीर (नगर) : शिर्डीतील आदिराजचे यकृत खराब झाल्यानंतर वडिलांनी त्याला स्वत:च्या यकृतातील तीस टक्‍के भाग दिला. दहाव्या वाढदिवसानिमित्त आदिराजला हे गिफ्ट मिळाल्याने नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटलमधील डॉक्‍टरांनी त्याचा शस्त्रक्रियेनंतर तेथेच वाढदिवस साजरा केला. 

मोलमजुरी करणारे शशिराम कुऱ्हाडे कुटुंबीयांसह शिर्डीत राहतात. घरची स्थिती अत्यंत हलाखीची असून, गुरुकुल शाळेत चौथीत शिकणारा आदिराज काही दिवसांपूर्वी आजारी पडला होता. प्राथमिक उपचारानंतर कावीळ झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. उपचाराला शरीर साथ देत नसल्याने त्याला औरंगाबाद, पुणे येथे उपचारासाठी पाठविले. डॉक्‍टरांनी त्याचे यकृत खराब झाल्याचे सांगितले. मात्र, पैसे नसल्याने वडिलांनी नातेवाइकांकडून पैसे घेऊन त्याला मुंबईतील अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

शस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी डॉक्‍टरांनी दुसऱ्याच्या यकृतातील काही भाग त्याच्या खराब झालेल्या यकृताला जोडावा लागणार असल्याचे सांगितले. अत्यंत किचकट अशी ही शस्त्रक्रिया असल्याने त्याच्या जिवाला धोका होता. मात्र, वडिलांनी त्यांच्या यकृतातील 30 टक्के भाग देऊन पित्याचे कर्तव्य बजावले.

दरम्यान, शस्त्रक्रियेच्या दिवशीच आदिराजचा दहावा वाढदिवस होता. वडील व डॉक्‍टरांमुळे त्याला जीवदान मिळाल्यामुळे हॉस्पिटलमधील कर्मचारी व डॉक्‍टरांनी एकत्र येऊन त्याचा वाढदिवस साजरा केला. दरम्यान, त्याला आणखी 20 लाख रुपयांच्या मदतीची गरज असल्याची माहिती त्याची आई अनिताने दिली. 

काळजाचा तुकडा 

माता-पित्यांचे आपल्या बालकावर खरोखर खूप प्रेम असते. तो त्यांच्या काळजाचा तुकडा असतो. त्याच्यासाठी आपल्या शरीराचा भाग देण्यास ते प्रसंगी मागेपुढे पहात नाहीत, याचा प्रत्यय या घटनेने आणून दिला आहे. संकट काळात मदतीसाठी पुढे येण्यातच खरी माणुसकी आहे.  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: नीरज चोप्राचे 'सुवर्ण' हुकले, Rumesh Pathirage ने मारली बाजी; पाकड्या अर्शद नदीमची लाज गेली, वाचा काय झालं...

३३ लाख वारकऱ्यांच्या गर्दीत एकही चोरी नाही! पोलिस अधीक्षक म्हणाले, आषाढी वारीइतकी गर्दी कधीच बघितली नाही, ‘सीएम साहेबांच्या दौऱ्याचेही खूप टेन्शन होते’, पण...

‘एमआयडीसी‘तील बंद टॉवेल कारखान्यात वेश्याव्यवसाय! वॉचमन महिलेचा कारनामा, अक्कलकोट रोड एमआयडीसीतील घटना, 2 पीडितांची सुटका; सोलापूर शहर पोलिसांची कारवाई

Mor Kali Recipe: नाश्त्यासाठी काहीतरी लाईट हवंय? बनवा दाक्षिणात्य पद्धतीची चविष्ट 'मोर कली'!

TEJASWIN SHANKAR HISTORICAL MEDAL: तेजस्विन शंकरने इतिहास घडवला! खडतर अशा डेकॅथलॉन स्पर्धेत भारताला जिंकून दिले पहिले पदक

SCROLL FOR NEXT