dhamane 
पश्चिम महाराष्ट्र

नोकरी अन्‌ जगणं, एका दिवशीचं संपलं 

सकाळवृत्तसेवा

सलगरे-सांगली ः जगणं काय असतं... पहिला श्‍वास आणि शेवटचा श्‍वास यामधलं अंतर असतं... ना जन्म हाती असतो, ना मृत्यू. पण, या दोन्ही गोष्टींमध्ये काही धक्कादायक बंध असतात. काही हवेसे, तर काही नकोसे. असाच एक नकोसा प्रसंग मालगाव (ता. मिरज) येथील एका शिक्षकाबाबत घडला आहे. या शिक्षकाची नोकरी आणि आयुष्य दोन्ही एकाच दिवशी संपलं. ही दुर्दैवी घटना 31 मे रोजी घडली. नोकरीतून निवृत्त होणारे शाळा कर्मचारी त्याच दिवशी मृत्यूमुखी पडले आणि एका दीर्घकर्मातून स्वल्पविराम घेण्याचा आनंद दुःखात बदलला.

 
मालगाव (ता. मिरज) येथील एस. एम. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात 1986 पासून प्रयोगशाळा परीचर असणाऱ्या प्रभाकर कल्लाप्पा धामणे यांच्याबाबत हा कटूप्रसंग उद्‌भवला. ते गेली 34 वर्षे नोकरीत होते. रविवारी, 31 मे रोजी त्यांची निवृत्ती होती. सेवेतील शेवटचा दिवस. वयाची 58 वर्षे पूर्ण करून ते आता दुसरी इनिंग खेळायला सज्ज होत होते, मात्र आठ दिवसांपूर्वीच त्यांना मेंदूत अतिरक्तस्राव झाला. त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर आठ दिवस उपचार सुरु होते. 31 मे रोजी त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. ज्या क्षणाला मोठ्या आनंदाने त्यांनी निवृत्त व्हावे, सहकारी कर्मचाऱ्यांनी त्यांच्याबद्दल भरभरून बोलावे, सारे आयुष्य उत्तम नोकरी केल्याबद्दल गोडधोड जेवू घालावे, अशा दिवशी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली. 


निवृत्तीनंतर आपल्या कुंटुबियासोबत सुखमय जिवनाची पहाट डोळ्यांनी पाहिलीच नाही. सेवानिवृत्ती दिवशीच त्यांना मृत्युंने कवटाळले आणि प्रभाकर धामणे यांचे निवृत्तीनंतरच्या स्वप्नांचा अंत झाला. निवृत्ती दिनी मृत्यु झाल्याने एस.एम.हायस्कूल व कॉलेज आणि मालगाव परीसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर 3.83? आठव्या वेतन आयोगाच्या बैठकीत विवाद! ..तर पगार किती वाढणार?

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT