Katal Sculptures Found in Sangli
Katal Sculptures Found in Sangli esakal
पश्चिम महाराष्ट्र

कोकणाप्रमाणंच सांगलीतही सापडल्या अश्मयुगीन संस्कृतीचं दर्शन घडवणाऱ्या 'आदिमानव वस्ती'च्या पाऊलखुणा

दीपक पवार

अश्मयुगीन संस्कृतीचे (Stone Age Culture) दर्शन घडवणाऱ्या या चित्रांचा पुरातत्त्व विभागाने अभ्यास करून ही ठिकाणे राज्य संरक्षित स्मारक घोषित करावे, अशी मागणी आहे.

इटकरे : कोकण विभागातील (Konkan) रत्नागिरी जिल्ह्यातील चार गावांतील कातळ शिल्पे राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित झाली आहेत. सांगली जिल्ह्यातही अशी कातळ शिल्पे (Katal Shilp) वाळवा तालुक्यात येडेनिपाणी, इटकरे, वशी, शिवपुरी, ढगेवाडी, ऐतवडे बुद्रुक, डोंगरवाडी, नेर्ले, भाटवडे, तर मळणगाव (कवठेमहांकाळ) येथे कातळ शिल्पे व चक्रव्यूह आढळून आले आहेत.

अश्मयुगीन संस्कृतीचे (Stone Age Culture) दर्शन घडवणाऱ्या या चित्रांचा पुरातत्त्व विभागाने अभ्यास करून ही ठिकाणे राज्य संरक्षित स्मारक घोषित करावे, अशी मागणी आहे. येडेनिपाणीजवळ मल्लिकार्जुन मंदिराच्या पश्चिम बाजूस ठिकठिकाणी कातळावर चिन्हे कोरली आहेत. महामार्गाच्या पश्चिमेस तुकाई डोंगरात महादेव मंदिराजवळ अशी शिल्पे आढळतात. वशी व डोंगरवाडीतील डोंगररांगांत सपाटी भागात व नेर्लेच्या सुळकी डोंगर परिसरात अशीच शिल्पे आढळली आहेत.

रिंग असलेले कप, जोडलेले कप, शेपटी कप, एककेंद्रित वर्तुळे, कोन तसेच सर्जनेंद्रियांच्या खुणा आढळतात. संशोधकांच्या मते, आदिमानव सखल भागातील शिकार करून सुरक्षिततेसाठी उंचवट्यावरील सपाटी भागात येत असावेत. वास्तव्यासाठी सुरक्षित असल्याने त्यांचा त्या जागी अधिकाधिक वावर राहिला असण्याची शक्यता आहे. या काळात दगडाच्याच अणुकूचीदार हत्याराने संवाद किंवा आदिमानवांना व्यक्त होण्यासाठी खडकावर चिन्हे कोरली असावीत.

आकाश निरीक्षण, तारे, हवामान, जन्म-मृत्यू नोंद, ऋतू, पाऊस, पाणीसाठा या बाबींशी निगडित चिन्हे आहेत. ती आदिमानवाच्या वास्तव्याच्या खुणा आहेत. संशोधक सचिन पाटील यांनी शिल्पांची पाहणी करून या परिसराला आदिमानव वसाहती, झुंडी, सातवाहन, चालुक्य, यादवकाल असा ऐतिहासिक वारसा असावा, असे मत मांडले आहे. डोंगर उतारावर २० ते ३० अंशाच्या कोनात कातळ शिल्पे आहेत. शिल्पांचे युरोप खंडातील स्वीडन, ब्रिटन, स्कॉटलंड, निअँडथर लॅंड येथे आढळलेल्या शिल्पांशी साधर्म्य आहे.

जिल्ह्यात आढळलेली शिल्पे आदिमानवाच्या अस्तित्वाच्या पाउलखुणा आहेत. मातृत्व व प्रजननाचे महत्त्वाचे पुरावे या चिन्हांकित खुणा असून त्या जतन व संवर्धनाची गरज आहे. शासनाने ही ठिकाणे राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केल्यास शिल्पामागचे रहस्य उलगडण्यास, संवर्धनास सहाय्य होणार आहे. ग्रामपंचायत पातळीपासून प्रयत्न होणे आवश्‍यक आहे. ग्रामपंचायतींनी ही ठिकाणे राज्य संरक्षित स्मारक करण्यासाठी शासनाकडे पत्रव्यवहार करून पाठपुरावा करायला हवा.

कोकणात १७५ गावांत शिल्पे

कोकणात १७५ गावांत २ हजारांहून अधिक कातळ खोदशिल्पे आहेत. उक्षी, बारसू, चवे, देवीहसोळ, कशेळी येथील शिल्पे राज्य संरक्षित स्मारक बनली आहेत. आणखी १२ ठिकाणांना दर्जा मिळेल.

जिल्ह्यातील ११ ठिकाणांची कातळ शिल्पे व पाच दगडी चक्रव्यूह हा पुरातत्त्वातील समृद्ध ठेवा आहे. संवर्धन होणे आवश्‍यक आहे. जिल्हा नियोजन समितीला प्रतिवर्षी निधी मिळतो. ३ टक्के रक्कम वारसा संवर्धनासाठी वापरायची आहे. कातळ शिल्प, चक्रव्यूह संरक्षणासाठी नियोजन करायला हवे.

-सचिन पाटील, पुरातत्त्व अभ्यासक, कुरळप

मल्लिकार्जुनसह वाळवा तालुक्यातील अन्यत्र आढळणाऱ्या कातळ शिल्पांना पुरातत्त्व विभागाने महत्त्व दिले पाहिजे. शासन पातळीवर संवर्धनाचा निर्णय होण्यासाठी ग्रामपंचायतीकडून पत्रव्यवहार करण्यात येईल.

-आनंदराव पाटील, माजी पंचायत समिती सदस्य, येडेनिपाणी

गावच्या पश्चिमेला सुळकी डोंगरात प्राचीन कातळ शिल्प कलाकृती आढळून आली. हा पुरातन समृद्ध ठेवा ‘सकाळ’ने समोर आणला. शासनाने ही ठिकाणे संरक्षित करावी. अनुदानही द्यावे. त्यासाठी ग्रामपंचायत पाठपुरावा करेल.

-संजय पाटील, सरपंच, नेर्ले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : ''तू निवडून कसा येतो तेच बघतो'' अजित पवारांनी धमकी दिलेल्या 'त्या' तीन उमेदवारांचं काय झालं?

Ind vs Ire : ओपनिंगपासून ते मिडल ऑर्डरपर्यंत बदले टीम इंडियाचे चित्र... जाणून घ्या आयर्लंडविरुद्ध कशी असेल Playing-XI

Sharad Pawar : ''जरांगेंबद्दल माहिती नाही, पण सरकारमध्ये नाराजी होती'', शरद पवारांनी सांगितलं विजयाचं कारण

Nagpur Lok Sabha Election Result : विजयाची हॅट्‌ट्रिक! गडकरींकडून ठाकरे पराभूत

Latest Marathi News Live Update: राज्यात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार?

SCROLL FOR NEXT