The history of Vishnudas Bhave will come in book form 
पश्चिम महाराष्ट्र

विष्णुदास भावेंचा इतिहास येणार पुस्तकरूपात

अजित कुलकर्णी

सांगली : मराठी रंगभूमीचा पाया रचणारे विष्णुदास भावे हे खरं तर सांगलीचं वैभव. मराठीतील पहिल्या संगीत नाटकाचे उद्‌गाते. संगीत नाटकांच्या दुनियेत झेंडा रोवून वेगळे स्थान निर्माण करणारा एक चतुरस्र अवलिया. त्यांच्याविषयी नव्या पिढीला भारी अप्रूप. मात्र, त्यांचा इतिहास अपवाद वगळता फारसा कुठे ज्ञात नाही. हा अस्पष्ट इतिहास समोर आणण्याचे काम नाट्यपंढरीतील रंगकर्मी करत आहेत. यंदाच्या मराठी रंगभूमीदिनी त्याची मुहूर्तमेढ रोवली गेलीय. त्यांचा समग्र इतिहास ज्येष्ठ लेखिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारणार आहे. हा ऐतिहासिक ठेवा लवकरच प्रस्तुत होईल. 

अखिल महाराष्ट्र मराठी नाट्य परिषदेने विष्णुदास भावे यांचे चरित्र पुस्तकरूपात साकारण्याची संकल्पना समोर आणली. 5 नोव्हेंबर 1843 रोजी सांगलीमध्ये "सीता स्वयंवर' या मराठी नाटकाचा पहिला खेळ झाला. तो दिवस मराठी रंगभूमी दिन म्हणून साजरा करण्याची प्रथा पडली. मात्र, त्याविषयी कोणताही ठोस पुरावा नसल्याचे सांगत भवाळकर यांनी वास्तव समोर आणले आहे. भावेंच्या 81 वर्षांच्या आयुष्यातील चढ-उतार, त्यांच्यातील कलागुण, अंगभूत गुणांवर प्राप्त केलेले ज्ञान, नवे प्रयोग, सुख-दु:खाचे प्रसंग, त्यांनी केलेला संघर्ष या सगळ्या जीवनप्रवासाविषयी नवी पिढी अनभिज्ञ आहे.

मराठी नाट्यपरंपरेचा हा जनक निवर्तल्यानंतर त्यांच्याविषयी इतिहासात त्रोटक माहिती असावी, ही खंत तमाम रंगभूमीला होती. त्यात यंदाचे शंभरावे अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन नाट्यपंढरीत करण्याचा मान सांगलीला मिळाला होता. कोरोनामुळे ते लांबले. त्या अनुषंगाने तयारी सुरू असताना ऑगस्ट महिन्यात तारा भवाळकर यांची भावेंच्या जयंतीनिमित्त दोन व्याख्याने होती; पण त्याचा विस्तार सहापर्यंत वाढला. ती ऐकल्यावर संयोजक अखिल महाराष्ट्र मराठी नाट्य परिषदेलाही माहीत नसलेले विष्णुदास भावेंचे अनेक पैलू कळाले. त्यानंतर परिषदेने त्यांची सहा व्याख्याने ठेवली.

शालेय शिक्षणात रस नसलेला विद्यार्थी ते व्यावसायिक रंगभूमीची मुहूर्तमेढ रोवणारा रंगकर्मी असा भावेंचा समग्र प्रवास भवाळकर यांनी अभ्यासपूर्णपणे कथन केला. हा प्रवास शब्दबद्ध करण्यासाठी नाट्य परिषदेचे मुकुंद पटवर्धन यांनी हालचाली सुरू केल्या. भवाळकर यांनी वयाच्या 81 व्या वर्षी हे आव्हान स्वीकारत होकार दर्शवला आहे.

दशावताराचे प्रयोग मराठी भाषेत सर्वप्रथम करणारे म्हणून विष्णुदासांची आजवर ओळख. त्या पलीकडे जाऊन भावेंनी उभारलेली नाटक कंपनी, त्याला गावोगावी मिळणारा अल्प प्रतिसाद, त्यातून झालेले कर्ज, बॉम्बे थिएटरमध्ये तिकीट लावून केलेला प्रयोग, त्यानिमित्ताने देवाधर्माच्या नावाने चालणाऱ्या नाटकाचा व्यावसायिक रंगभूमीवर झालेला श्रीगणेशा, त्यावर झालेली टीका, शेवटी सगळ्यांपासून घेतलेली फारकत रंजकपणे रसिकांसमोर येणार आहे. 

अज्ञात पैलू आगामी पुस्तकात शब्दबद्ध

विष्णुदास भावे यांचे अंतरंग तत्कालीन सांगली संस्थानचे राजे चिंतामणराव पटवर्धन यांनी ओळखले होते. शालेय वयातच शिक्षणापेक्षा कीर्तन, तमाशा, गाणी, गोष्टी, चित्रकला, रेखाटनात विशेष रुची असल्याने त्यांच्या या गुणांना राजेसाहेबांनी प्रोत्साहन दिल्याचा इतिहास आहे. त्यानुसार रंगभूमीवरही त्यांनी व्यावसायिकता आणत अंगभूत गुण सिद्ध केले. हिंदी भाषेत नाटक लिहून त्याचे रंगमंचावर सादरीकरण केल्यामुळेच त्यांना हिंदी रंगभूमीला जन्म देणारा मराठी नाटककार म्हणून धुरीणांनी गौरवले आहे. त्यांचे अज्ञात पैलू आगामी पुस्तकात शब्दबद्ध करण्याचा विशेष आनंद आहे. 
- प्रा. डॉ. तारा भवाळकर, ज्येष्ठ लेखिका 

संपादन : युवराज यादव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ३१ जानेवारीपूर्वी घ्या, सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकारला आदेश

Latest Marathi News Updates : ओबीसींचा बॅकलॉग तातडीने भरावा; सरकारचा जीआर वादग्रस्त – छगन भुजबळ

Smriti Mandhana: शाब्बास पोरी! स्मृती मानधनाचा जगभरात दबदबा, वन डे वर्ल्ड कपपूर्वी ICC ने दिली आनंदाची बातमी

Gemini Retro Saree Trend होतोय खूप व्हायरल; पण फोटो बनवताना अजिबात करू नका 'या' 5 चुका, नाहीतर इमेज खराब होणारच

Hidden Story: समुद्राखाली दडलेलं सोनं-चांदीपेक्षा मौल्यवान काय आहे? भारत उलगडणार रहस्य, चावी मिळाली

SCROLL FOR NEXT