Holi of Corona monster in Sangli 
पश्चिम महाराष्ट्र

होळी केली कोरोना राक्षसाची 

सकाळ वृत्तसेवा

सांगली : सांगली-मिरजेसह परिसरातील उपनगरात आणि ग्रामीण भागात पारंपारिक पद्धतीने होळी साजरी करण्यात आली. सांगलीतील खणभाग पोलिस चौकीजवळील मित्र मंडळाने यंदा होळीत "कोरोना व्हायरस' च्या प्रतिकृतीचे दहन करून भारत कोरोना विषाणूविरोधात लढण्यासाठी सज्ज असल्याचा संदेश दिला. 
 


विशेषत: उत्तर भारतात उत्साहाने होणारा सण म्हणून होळीला ओळखले जाते. होळी, दुसऱ्या दिवशी धुळवडला रंगोत्सव केला जातो. महाराष्ट्रात होळीनंतर पाचव्या दिवशी रंगपंचमी खेळली जाते. महाराष्ट्रात कित्येक वर्षे पारंपारिक पद्धतीने होळी साजरी केली जाते. शहरी भागासह ग्रामीण भागात अनेक ठिकाणी शेळी, लाकडे गोळा करून होळी पेटवली जाते. यंदाही मंडळांच्या होळीबरोबर अनेकांनी वैयक्तिक घरासमोर शेणी विकत आणून होळी पेटवल्याचे चित्र दिसले. होळीत नारळ, पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात आला. 


सोमवारी सायंकाळनंतर शहरातील अनेक चौकात होळी पेटवल्याचे चित्र दिसले. होळीसमोर फेर धरून चिमुकल्यांनी बोंब मारली. सायंकाळीनंतर टिमक्‍याचा आवाज सर्वत्र घुमला. होळीत टाकलेले नारळ आणि पुरणाची पोळी हात घालून बाहेर काढणारे तरूणही दिसले. होळीनिमित्ताने अनेक मंडळांनी परिसर स्वच्छ करून तेथील कचरा जाळून स्वच्छतेचा संदेश दिला. 
होळीनिमित्त खणभाग पोलिस चौकीजवळील मंडळाने होळीत "कोरोना राक्षस' अशी प्रतिकृती बनवून त्याचे दहन केले. कोरोना व्हायरसला घाबरून न जाता त्याचा दक्षतेने सामना करून तो नष्ट करा, असा संदेश होळीच्या माध्यमातून दिला. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काव्या मारनने एवढ्या आनंदाने अबरार अहमदला संघात घेतले; पाकड्यांनी दाखवली लायकी, The Hundred मधून घेऊ शकतो माघार...

Narhari Zirwal : अन्न भेसळीविरोधात झिरवाळ आक्रमक! १९७ नवीन अधिकाऱ्यांची फौज मैदानात, कठोर कायद्याची तयारी

Devendra Fadanvis: 'गॅससाठी रांगा लावू नका', फडणवीस नेमकं काय म्हणाले?

Pimpalgaon Ttoll Plaza : टोल की लूट? पूर्वसूचना न देता स्थानिक पास धारकांना बसतोय आर्थिक फटका; आंदोलनाचे संकेत

Latest Marathi News Live Update : आर्मी ऑफिसर बनून डॉक्टरची सायबर फसवणूक

SCROLL FOR NEXT