Honai Temple Sakal
पश्चिम महाराष्ट्र

Honai Temple : श्रावणातील भक्तिरंग : होनाई परिसर पर्यटन, भक्तीचा संगम

निसर्ग पर्यटन व भक्तीचा अनोखा संगम म्हणजे तासगाव तालुक्यातील हातनूरच्या होनाईदेवी मंदिराचा परिसर आहे.

लक्ष्मण माने

विसापूर - निसर्ग पर्यटन व भक्तीचा अनोखा संगम म्हणजे तासगाव तालुक्यातील हातनूरच्या होनाईदेवी मंदिराचा परिसर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा परिसर आहे. ऐतिहासिक वारसाही आहे. होनाईचा डोंगर नावाने प्रसिद्ध डोंगरावर होनाईदेवीची स्थापना झाली आहे.

आजूबाजूला डोंगररांगा, त्यावरच्या पवनचक्क्या, जवळच हाकेच्या अंतरावर असलेले पेडचे पर्यटन स्थळ अशा निसर्गाच्या कुशीत वसलेले येथील होनाई मंदिर भक्तांबरोबर पर्यटकांनाही श्रावण महिन्यात साद घालत आहे. त्यामुळे या महिन्यात शाळकरी विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांची पावले या मंदिराकडे वळत आहेत. म्हणूनच चला, जाऊया होनाईला.. असे म्हणत आहेत.

होनाईदेवी ही आई तुळजाभवानीचा अवतार असल्याचे सांगितले जाते. येथे देवी कशी आली, याची आख्यायिका सांगितली जाते. कन्नड प्रांतातून येथील ओढ्यातील परीट घाटावर देवी आली होती. येथे देवीचे जुने मंदिर होते. मात्र परीट घाटावरील पाणी येत असल्याने देवीजवळच डोंगर असलेल्या ठिकाणी प्रकट झाली. त्यानंतर खोदकाम करताना देवीची मूर्ती सापडली. येथे मूर्तीची प्रतिष्ठापना केली.

हे जुने मंदिर अकराव्या शतकातील आहे. आता नवीन मंदिराचे बांधकाम सुरू आहे. या मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेशद्वारावर जय व विजय अशा दोन मूर्ती आहेत. गाभाऱ्यात होनाईदेवीची जुनी मूर्ती आहे. मागे श्री महालक्ष्मीची मूर्ती आहे. या मंदिराजवळच एक विहीर आहे. मात्र, या विहिरीचे पाणी कधीही आटत नाही, हे वैशिष्ट्य आहे. जवळच खंडोबाचे मंदिर आहे.

छत्रपती शिवाजी महाराज या डोंगरावर येऊन गेल्याचे सांगितले जाते. येथे किल्ला बांधण्याचे महाराजांचे नियोजन होते. मात्र, बाजूला शत्रूंना लपण्यासाठी डोंगररांगा असल्याने येथे किल्ला बांधला नाही. डोंगराच्या माथ्यावर घोड्याच्या नालेचा आकार असल्याचे दिसते. या ठिकाणी राजा रामकृष्ण देवरायही आल्याची नोंद आढळते. डोंगराचा पर्यटन स्थळ म्हणून विकास होत आहे. त्यामुळे अद्यापही कामे सुरू आहेत.

पायथ्यावर असणारे प्रवेशद्वार, उत्कृष्ट पायऱ्या व कोणार्क मंदिराची प्रतिकृती असलेले होनाईचे नवीन मंदिर पर्यटकांसह भाविकांना भुरळ पाडत आहे. डोंगरावर ग्रामपंचायतीने गेल्या दोन ते तीन वर्षांत तीस ते पस्तीस हजार झाडांची लागवड केली आहे. परिसर अतिशय सुंदर आहे.

श्रावणात मंगळवार व शुक्रवारी भाविकांची गर्दी असते. पावसाळ्यामुळे डोंगर हिरवाईने नटलेला आहे. त्यामुळे पदभ्रमंती करणाऱ्यांचीही गर्दी असते. नवरात्रात नऊ दिवस देवीची जागर असतो. पहाटे येथे गर्दी असते. मंदिरावर रोषणाई केली जाते. माघी पौर्णिमेला येथे मोठी यात्रा भरते. डोंगराच्या पायथ्याला सुंदर कुस्ती मैदान आहे.

कसे जाल... ?

  • सांगली-विटा मार्गावर तासगाव ते खानापूर रस्त्यावर अंदाजे दहा किलोमीटर

  • विटा-पारेमार्गे १४ किलोमीटर

  • खानापूरहून १६ किलोमीटरवर हातनूर आहे. हातनूर येथून एक किलोमीटरवर होनाईचा डोंगर आहे. हातनूरपर्यंत बस उपलब्ध आहेत. परिसरातील मुले, ग्रामस्थ इथे पायी येतात.

होनाईदेवीसह पेड पर्यटनस्थळासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर करून आणला. यामधून काही कामे सुरू झाली. मात्र, निधी कमी पडू लागल्याने या दोन्ही ठिकाणी कामे अर्धवट राहिली आहेत. गावकऱ्यांनी प्रचंड मदत केली, मात्र लोकप्रतिनिधींनी उर्वरित कामांसाठी निधीकरिता प्रयत्न करावेत.

- सुभाष पाटील, अध्यक्ष, देवस्थान समिती, माजी सदस्य, जिल्हा परिषद, सांगली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Involvement in Red Fort Blast : अखेर पाकिस्तानचा खोटेपणाचा बुरखा फाटलाच! दिल्ली स्फोटातील सहभागाची नेत्यानेच दिली कबूली

Petrol Pump : पेट्रोल पंप संध्याकाळी सातनंतर बंद करण्याचा निर्णय मागे; पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचा निर्णय

Mundhwa Land Case : मुंढवा जमीन प्रकरणात शीतल तेजवानींचा जबाब नोंदविला

Pravin Darekar : सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाला गती; सहकाराला आधुनिकतेची जोड द्यावी

Property Tax : समाविष्ट गावाच्या मिळकतकराचा प्रश्‍न जैसे थे; पूर्वीच्याच आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT