mahapalika.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

83 नगरसेवकांनी यांना मदतीसाठी दिले मानधन 

सकाळवृत्तसेवा

सांगली- आपल्या कुटुंबीयांची काळजी न करता तुटपुंज्या मानधनावर कोरोनासारख्या गंभीर साथीच्या काळात जोखमीचे काम करणाऱ्या महापालिकेच्या आशा वर्कर्सच्या मदतीसाठी महापालिकेचे नगरसेवक धावून आले आहेत. त्यांनी आपले एक महिन्याचे मानधन आशा वर्कर्सना देण्यासाठी प्रशासनाकडे संमती पत्रे सादर केली आहेत. आज वीस नगरसेवकांनी अशी पत्रे दिली. 


महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी आशा वर्कर्सना मदतीसाठी नगरसेवकांनी एक महिन्याचे मानधन द्यावे असे आवाहन केले होते. त्याला नगरसेवक प्रतिसाद देत नगरसचिव विभागाकडे संमती पत्रे जमा करायला सुरुवात केली आहे. कोरोनासारख्या आपत्ती काळात आशा वर्कर्सनी जोखमीचे काम केले आहे. त्यांच्या कामाचं बक्षीस म्हणून त्यांना त्यांच्या पगारात वाढीव रक्कम देण्याचे नियोजन आयुक्त कापडणीस यांनी केले आहे. त्यासाठी त्यांनी नगरसेवक तसेच पदाधिकारी यांनी एक महिन्याचे मानधन आशा वर्कर्सना बक्षीस देण्यासाठी जमा करण्याचे आवाहन केले. आज वीस नगरसेवकांनी आपले मानधन जमा करून घेण्याचे पत्र नगरसचिव चंद्रकांत आडके यांच्याकडे जमा केले. 


महापालिकेच्या 83 नगरसेवकांनी एक महिन्याचे मानधन आशा वर्कर यांना बक्षीस म्हणून दिले तर यामधून आठ लाख 30 हजारांची रक्कम जमा होणार आहे. यामुळे प्रत्येक आशा वर्करला पाच हजार रुपयांहून अधिक अतिरिक्त मानधन मिळेल. 
नितीन कापडणीस, आयुक्त 
 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Closed: सलग 5 दिवस बँका बंद? SBIने दिली अपडेट; सॅलरी-पेन्शन खात्यांसाठी सूचना, कोणत्या दिवशी बँका बंद?

IND vs JPN: भारतीय T20I संघ जपानमध्ये पहिल्यांदाच खेळणार! जाणून घ्या संभावित Playing XI अन् कधी व कुठे पाहाणार ऐतिहासिक सामना?

‘महाभारत’चा भीम 'सौरव गुर्जर'वर गंभीर आरोप; महिलेला लग्नाचे आमिष दाखवून जाळ्यात ओढलं, पोलिसांनी केली अटक

Pune News: पुणेकरांना गुंठेवारीत दिलासा नाही! मुदतवाढ मिळाली, पण शुल्कात कपात नाही; जुन्याच दराने नियमितीकरण

Marathi News Live Updates : येत्या महिनाभरात मुंबई महानगरपालिकेच्या 800 अभियंत्यांची होणार उचलबांगडी, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT