पश्चिम महाराष्ट्र

अनुराधा बिराजदारच्या खूनाने महाराष्ट्र कर्नाटक सिमा हादरली

महेश पाटील

सलगर बुद्रुक : अनुराधा बिराजदार हिच्या खुन प्रकरणाने महाराष्ट्र कर्नाटक सिमेलगतच्या गावात सैराटचा रीमेक झाल्याने सलगर बु. परिसरासह संपूर्ण मंगळवेढा तालुकाच या घटनेने हादरुन गेला होता. गुरवारी (ता.4 सप्टेंबर) बोराळेतील मामांच्या घरात असणाऱ्या अनुराधाला गावी घेऊन जाण्यासाठी वडिलांची इनोव्हा आल्यावर भीती पोटी ती गाडीत बसली. लाडक्या भाचीला वडिलांच्या सोबत पाठवताना मामाला हुरहूर लागली होती. मामाचा मध्यरात्रीनंतर अचानक फोन खनखनला. पायाखालची जमीन सरकली होती. अगदी कांही तासापूर्वी जड अंतकरनाने भाचीला वडिलांच्या गाडीत बसवले होते. त्याच लाडक्या धडधाकट अनुराधाला मामा पोरका झाला. माता पित्याच्या क्रुरतेने माणुसकीची परीसिमा ओलांडली होती. तळ हाताच्या फोडाप्रमाने जपलेल्या पोटच्या पोरीला माता पित्यानेच संपवले होते. वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या बावीस वर्षीय अनुराधा बिराजदार या युवतीचा निर्घून खून झाला.

अनुराधाचा जन्म सलगर बुद्रुक मधील बिराजदार या प्रतिष्टित घराणेशाही असलेल्या घरात झाला होता. तिचे वडील विकास सोसायटीचे माजी अध्यक्ष होते. शिवाय शिक्षण प्रसारक मंडळ सलगर बुद्रुकचे सचिव होते. सलगर मधील विद्या मंदिर हायस्कूल व ज्यूनियर कॉलेज मध्ये ते जूनियर क्लार्क होते. व सर्व संस्था त्यांच्या ताब्यात आहे. आई माजी ग्रामपंचायत सदस्य, एवढा राजकीय, सामाजिक, शैक्षणिक दरारा असणाऱ्या वडिलांना अनुराधाचा हा प्रेमविवाह मनाला धड़की भरवनारा होता.

अनुराधा अवघ्या तीन वर्षाची असताना अनुराधाची आई देवाघरी गेली. त्यांनंतर अनुराधाचे दहावी पर्यंतचे शिक्षण मामाच्या गावी झाले. त्यांनंतर बारावीला सलगरच्या विद्या मंदिर हायस्कूल व ज्युनियर कॉलेजात शिकत असताना तिचे श्रीक्षेल बिरादर या मुलाशी प्रेम संबंध जुळले. याची माहिती वडिलांना समजताच श्रीशैलच्या कुटुंबाला सलगर मधून जाण्यास भाग पाडले. पुढे कर्नाटकातील सिंदगी येथे वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी अनुराधा गेली असता श्रीशैल अनुराधाची पुन्हा भेट झाली. त्यातच त्यांनी 1 ऑक्टोबरला विजापुर येथील कोर्टात जावून प्रेमविवाह केला. वडिलांना ही बातमी समजताच समाज्याच्या व खोट्या प्रतिष्टेच्या भिंती यांच्या सुखी वाटचालीस आडव्या आल्या. व प्रेमविवाहाच्या वेलीवरिल कळ्या खुलन्या आदीच विस्कटल्या गेल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Plastic Note: भारतात प्लास्टिकच्या नोटा कधी सुरू होणार? RBI गव्हर्नरांनी 'ती' वेळच सांगितली; महत्त्वाची माहिती समोर

Numerology: न सांगताही ओळखतात मनातील भावना! लहानपणापासूनच 'सीक्रेट कीपर' असतात 'या' मूलांकाचे लोक...

सर डॉन ब्रॅडमन यांनी ३ षटकांत झळकावले होते शतक... २५६ धावांच्या खेळीत १४ षटकार, २९ चौकारांची आतषबाजी...

Latest Marathi News Live Update : पुण्यातील खडक पोलीस स्टेशनच तपास पथक पोलीस आयुक्तांनी केल्या बरखास्त

Pune Police: भाडेकरुंमुळे अडचणीत आले पुण्यातले घरमालक! 76 जणांवर गुन्हे दाखल; 'या' चुका पडल्या महागात

SCROLL FOR NEXT