mangalwedha
mangalwedha 
पश्चिम महाराष्ट्र

डिसेंबर अखेर मंगळवेढ्यातील दुष्काळ दूर होण्याची आशा

हुकूम मुलाणी

मंगळवेढा - दक्षिण भागाचा दुष्काळ हटविण्यासाठी 1983 मध्ये आराखडा केलेल्या म्हैसाळच्या कामात आता पर्यंत आठ आमदार वेगवेगळ्या पक्षाची आठ सरकार स्थापन झाली. 180 कोटीची योजना आज तीन हजार कोटी खर्चूनही तालुक्याला पाणी मिळाले नाही. परंतु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरीव निधी दिल्याने डिसेंबर अखेर या योजनेचे पाणी मिळून दुष्काळ हटेल असा आशावाद प्रशांत परिचारक यांनी व्यक्त केले.

शिरनांदगी येथे उजाला योजनेतील लाभार्थ्याला गॅस वितरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी दुध संघाचे संचालक औदुंबर वाडदेकर, अनिल बोदाडे, सैपन शेख शशिकांत चव्हाण, राजेंद्र सुरवसे, गौरीशंकर बुरकूल, राम खताळ, सतोष कांबळे, महादेव खताळ, अंकुश खताळ, अंकुश किसवे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी बोलताना आ.परिचारक म्हणाले की म्हैसाळ योजनेचा आराखडा 1983 साली तयार करण्यात आला त्यावेळी या योजनेचा खर्च 180 कोटी होता यात समावेश नसलेले तालुक्याचा राजकीय ताकदीवर समावेश करून निधी नेवून पाणीही नेले.पण मंगळवेढा, सांगोल्यातील गावे वंचित आहेत, 38 वर्षे रखडलेल्या म्हैसाळ सिंचन उपसा योजना निधी अभावी तर आलेला निधी अन्य तालुक्यासाठी पळवून नेल्यामुळे शिवाय अधिकाय्राच्या भ्रष्टाचारामुळे रखडली.

परंतु या योजनेस विद्यमान सरकारने तीन वर्षात भरीव निधी दिल्यामुळे डिसेंबर अखेर या योजनेचे पाणी दक्षिण भागातील वंचित गावाला मिळणार असल्यामुळे त्यांचा पिढ्यान पिढ्याचा दुष्काळ भविष्यात हटण्यास मदत होणार आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांनी पन्नास टक्के काम पूर्ण झालेल्या योजना कार्यान्वीत करण्यासाठी अधिक लक्ष दिल्याने रखडलेल्या अनेक योजना मार्गी लागत आहेत त्यात म्हैसाळी ही योजना आहे. या योजनेत 2010 पासून निधी दिला नाही. परंतू या तीन वर्षात निधी मिळेल.केंद्र शासनाच्या अनेक योजना आधारशी संलग्न केल्यामुळे या योजनाचा लाभ थेट लाभार्थाला होवू लागला. सुत्रसंचालन सुनिल कांबळे यांनी तर आभार संतोष बिराजदार यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जीव दे म्हटलं म्हणून एखाद्याने खरंच जीवन संपवलं तर काय? हायकोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

Instagram Algorithm : इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा बदल; ओरिजिनल कंटेंट होणार प्रमोट.. मात्र यूजर्सचं टेन्शन वाढणार!

Namrata Sambherao: "महाराष्ट्राची लाडकी नमा..."; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरनं नम्रता संभेरावला लिहिलं खास पत्र

Viral Video: खिशात खेळण्यातली पिस्तूल सापडल्यानंतर पकडले कान, मुंबई मेट्रो स्टेशन वरील चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : कुर्ल्यातील भाभा हॉस्पिटलमध्ये कामबंद आंदोलन

SCROLL FOR NEXT