crime.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

भयानकच...येथे दारू पाजून तरूणीवर केला बलात्कार : दोघांना तत्काळ अटक

सकाळवृत्तसेवा

मिरज- संचारबंदीची कडक अंमलबजावणी सुरू असतानाही शहरातील रेल्वे स्थानक परिसरात दोघा तरुणांनी एका तरुणीस दारू पाजुन तिच्यावर बलात्कार केला. या दोघांनाही महात्मा गांधी चौक पोलिस पोलिसांनी काही तासात अटक केली. अक्षय कलशेट्टी आणि राजू अच्युधन अशी अटक केलेल्या तरुणांची नावे आहेत. त्यांना न्यायालयाने सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. बुधवारी ( ता 22 ) रोजी रात्री ही घटना घडली.

पीडित तरुणी ही कोल्हापूर जिल्ह्याच्या एका खेड्यातील आहे. ती विमनस्क अवस्थेत रेल्वेस्थानकाच्या निर्मनुष्य भागात फिरत असताना तिला दोघा संशयितांनी गाठले. आणि तुझ्याकडे काम आहे असे सांगून तिला दारू पाजली. आणि बलात्कार करून तिथेच सोडून दिले. संबंधीत तरुणीने याबाबत बस स्थानक परिसरात फिरणाऱ्या पोलिसांना याची माहिती सांगितली. संबंधित तरुणीने सांगितलेल्या केवळ वर्णनावरून महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे यांनी दोघा तरुणांना केवळ काही तासात अटक केली.

पोलिसी खाक्‍या दाखवताच दोघांनीही गुन्हा कबूल केला. दोघांनाही तातडीने न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने या दोघांनाही सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यासाठी रात्रभर शोध मोहीम राबवली. बलात्कार केलेल्या दोघा तरुणांची पार्श्वभूमीही गुन्हेगारी स्वरूपाची असल्याचा संशय सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे यांनी व्यक्त केला. 

राज्य उत्पादन शुल्कचे धिंडवडे 

संचारबंदी काळातही मिरज शहरासह ग्रामीण भागातही राजरोसपणे गावठी आणि इंग्लिश दारूची विक्री सुरू आहे. या बलात्काराच्या घटनेत संशयितांनी उपलब्ध केलेली दारूही अशाच प्रकारे मिळवली आहे. त्यामुळे बलात्काराच्या घटनेनंतर राज्य उत्पादन शुल्कच्या कारभाराचे पुन्हा एकदा धिंडवडे निघाले आहेत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT