NER20A00612_pr.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

80 वर्षाचे "भाऊ'  पडले बिबट्याला भारी ःवाचा कसे

विजय लोहार

नेर्ले (सांगली) ः वेळ दुपारी तीनची. आपल्या शेळीवर बिबट्याने हल्ला केल्यानंतर शेळीला फरफडत नेहणाऱ्या बिबट्या वरच 80 वर्षाच्या वध्दाने हल्ला करून आपल्या शेळीचा जीव वाचवला. अंगावर शहारे आणणारी घटना शिराळा तालुक्‍यातील आरळा परिसरात येसलेवाडी गावात घडली. त्या 80 वर्षाच्या वध्दाचे नाव भाऊ पांडू जाधव असून परिसरात त्यांचे कौतुक होत आहे. 

घटनास्थळी मिळालेली माहिती अशी, सोमवार (ता. 1) रोजी सकाळी नेहमीप्रमाणे आरळा डोंगर परिसरात आपल्या शेळ्या व पाळीव जनावरांना चरण्यासाठी घेऊन येसलेवाडी (ता. शिराळा) येथील 80 वर्षाचे भाऊ पांडू जाधव हे निघाले. शेळ्या चरत असताना येसलेवाडी येथील कांदाची मळी येथे दुपारी तीनच्या सुमारास अचानक एका बिबट्याने एका शेळीवर हल्ला चढवला. यात शेळी जबर जखमी झाली.

साधारणपणे दोन ते तीन मीटर बिबट्यlने शेळीला गळ्याला धरुन फरफडत नेले. क्षणाचाही विलंब न करता भाऊ पांडू जाधव यानी धाडसाने आपल्या हातात असणाऱ्या काठीने शेळी ओढणाऱ्या बिबट्यावरच हल्ला केला. दोन चार काट्या बसल्यानंतर भेदरलेल्या बिबट्याने शेळी तेथेच सोडून पळ काढला. अंगावर काटा आणणारी घटना घडल्यानंतर घटनास्थळी लोकांनी धाव घेतली. जीवाची पर्वा न करता 80 वर्षांच्या भाऊ पांडू जाधव यांनी केलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

जखमी शेळीवर उपचार करण्यात आले. आरळा येसलेवाडी पासून चांदोली अभयारण्य जवळच असल्याने बिबट्याचा वावर परिसरात वाढला आहे. लोकांनी अनेक वेळा तक्रारी करूनही दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी दिपक पांडूरंग येसले. सुनिल शिवाजी येसले संदीप आकाराम येसले. राजु बंडू येसले. शेतकरी यांच्यातून होत आहे.जेमतेम 600 लोकसंख्या असणारे गाव असले तरी बिबट्याच्या हल्ल्याने सद्या जीव मुठीत धरून बसले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ratnagiri Road Project : रत्नागिरीकरांसाठी मोठी बातमी! मिरजोळे एमआयडीसीच्या मुख्य रस्त्याचे 24 कोटींतून होणार चौपदरीकरण; असा असणार नवा लूक

IndiGo Flight: विमान उड्डाणाच्या काही क्षण आधी मोठा ट्विस्ट! पायलटचा उड्डाणास नकार; प्रवाशांचे आंदोलन

Junior Asia Cup Hockey: तब्बल १९ गोल... भारताच्या पोरींनी उडवली पाकिस्तानची पुरती धुळधाण! सेमीफायनलमध्ये दिमाखात धडक

Viral Video : आधी पैसे द्या, मगच जेवण करा! या देशातील लग्नाची अनोखी प्रथा पाहून भारतीय महिलेलाही बसला धक्का, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

Marathi News Live Updates : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर पुणे पोलीस अलर्ट मोडवर

SCROLL FOR NEXT