hand wash 
पश्चिम महाराष्ट्र

सॅनिटायझर, हॅंडवॉशच्या किंमती अचानक वाढल्या कशा?

सकाळवृत्तसेवा

सांगली ः कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यात महत्वाचा घटक असलेल्या साबण, सॅनेटाटाझर, हॅंड वॉशच्या किंमतीत काही कंपन्यांनी अचानक 10 टक्‍क्‍यांपर्यंत वाढ केली आहे.

या किंमत वाढीची तातडीने चौकशी करावी आणि राष्ट्रीय संकटाचा गैरफायदा घेतल्याबद्दल कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हा संघटक दिगंबर जाधव यांनी केली आहे.

ते म्हणाले, ""देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव गतीने व्हायला लागला आहे. त्याचा फैलाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून खूप ताकदीने प्रयत्न सुरु आहेत. लोकही सावध आहेत. या काळात सतत हात धूत राहणे, स्वच्छता राखणे हे महत्वाचे आहे. सरकारही हात धुण्यासाठी आवाहन करत आहे. जाहिराती सुरू आहेत. अशावेळी देशातील एका बड्या उत्पादक कंपनीने आपली उत्पादने कमी किंमतीला विकायला हवी होती. कारण, या कंपन्यांनी देशातील लोकांच्या जीवावर कोट्यावधी रुपये कमावले आहेत.``

``या संकट काळात त्यांनी त्यातून उतराई व्हायला हवे होते. त्याउलट या कंपन्यांनी 5 ते 10 टक्के दरवाढ केली आहे. साबण, सॅनेटायझर आणि हॅंड वॉशच्या किंमतीत वाढ अनाकलनिय आहे. त्याची चौकशी झालीच पाहिजे. सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली पाहिजे, अशी मागणी राज्य शासनाकडे मी केली आहे.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav Ayurvedic Prasad: गणेशोत्सवातील प्रसादातून मज्जाधातूचे पोषण; आयुर्वेदानुसार मोदक, पंचामृत, लाडू व लाह्यांचे मेंदूवर्धक गुण

आजचे राशिभविष्य - 11 सप्टेंबर 2026

Haritalika Ritual: हरितालिका व्रताचा खरा अर्थ काय? पार्वतीच्या तपश्चर्येपासून विवाहातील प्रेम, निवड, संयम आणि नात्यांच्या संतुलनापर्यंत

Ayurvedic Treatment: ३५व्या वर्षी हाडे ठिसूळ होऊन वारंवार फ्रॅक्चर का? आयुर्वेदातून काय मदत मिळू शकते; आहार, अभ्यंग आणि उपचाराबाबत जाणून घ्या

Lucky Zodiac Signs : 10 वर्षांनंतर जुळून आला 'त्रिग्रही योग'! 11 सप्टेंबरला मिथुन, धनुसह 5 राशींना लॉटरी लागण्याची शक्यता; जुन्या गुंतवणुकीतूनही मिळणार बंपर परतावा

SCROLL FOR NEXT