LAXMAN MUNDHE.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

किती भयानक : तो पत्नीचेही शिर धडावेगळे करणार होता...नंतर दोन्ही शिर पोलिसांना देणार होता.. 

सकाळवृत्तसेवा

देवराष्ट्रे (सांगली)- पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून देवराष्ट्रे (ता. कडेगाव) येथील जयसिंग शामराव जमदाडे (वय 45) याचा शिर धडावेगळे करून निर्घृण खून केल्याप्रकरणी संशयित लक्ष्मण निवृत्ती मुंढे (वय 52) याला अटक केली. जयसिंगचे तोडलेले शिर घेऊन पत्नीला दाखवून तिचेही शीर धडावेगळे करणार असल्याची खळबळजनक माहिती पोलिस तपासात दिली. तसेच दोघांचे शिर घेऊन पोलिस ठाण्यात हजर होणार असल्याचेही सांगितले. त्याची माहिती ऐकून पोलिसही चक्रावले गेले. 


पोलिसांनी दिलेली माहिती अशी, देवराष्ट्रे जयसिंग जमदाडे याचे संशयित मुंढे याच्या घरी सतत येणे-जाणे होते. जयसिंगचे पत्नीशी अनैतिक संबंध असावेत असा त्याला संशय होता. त्यातून त्याच्या डोक्‍यात विचारचक्र सुरू होते. 4 जून रोजी त्याने जयसिंगचा काटा काढण्याचे ठरवले. जयसिंग हा त्या दिवशी शेतात गेला होता. वैरण घेऊन परत येत असताना मुंढे याने वाटेत त्याच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. त्वेषाने वार करून त्याचे शिर धडावेगळे केले. हल्ल्यानंतर परिसरात नागरिक गोळा होऊ लागताच मुंढे तेथून पसार झाला. 


चिंचणी-वांगी पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंद झाला होता. पोलिसांच्या प्राथमिक तपासात अनैतिक संबंधाच्या संशयावरून खून केल्याची माहिती पुढे आली होती. मुंढे याच्या शोधासाठी चिंचणी-वांगी पोलिस आणि एलसीबीचे पथक रवाना झाले होते. मुंढे याने पाच दिवस पोलिसांना चकवा दिला. त्याने शेतातच आसरा घेतला होता. बुधवारी शिरगाव येथे शिवारात तो लपला असल्याची माहिती मिळाल्यानंतर चिंचणी-वांगी पोलिसांनी त्याला सापळा रचून पकडले. 


मुंढे याला पकडल्यानंतर चौकशीत त्याने खुनाची कबुली दिली. अनैतिक संबंधाच्या संशयावरून खून केल्याची कबुली मुंढे याने दिली आहे. तसेच चौकशीत त्याने जयसिंगचे धडावेगळे केलेले शिर पत्नीला दाखवणार होतो. त्यानंतर तिचे शिर देखील धडावेगळे करणार होतो. त्यानंतर दोघांचे शिर घेऊन पोलिस ठाण्यात हजर होणार असल्याची धक्कादायक आणि खळबळजनक माहिती दिली. अंगावर शहारे आणणाऱ्या त्याच्या माहितीने पोलिस देखील चक्रावले आहेत. मुंढे हा सतत पाठीवर कुऱ्हाड टाकून गावातून फिरत होता. त्याची दहशत होती अशी माहिती पुढे आली आहे. मुंढे याला अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले असता पोलिस कोठडी सुनावली आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शिक्षकांची नाही यंदा उन्हाळ्याची सुट्टी! एप्रिलअखेर जनगणनेचे प्रशिक्षण अन्‌ १६ मे ते १४ जूनपर्यंत करावी लागणार घरगणना, विशेष रजा मिळणार, वाचा...

Panchang 18 March 2026: आजच्या दिवशी विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे पठण आणि ‘बुं बुधाय नमः’ या मंत्राचा जप करावा

मोठी बातमी! इराक-इराण युद्धाची सोलापूरकरांना झळ; सोलापूर शहरात रिक्षा चालकांनी वाढविले १० ते १५ रुपये भाडे; कोणत्या मार्गावर किती भाडे? वाचा...

आजचे राशिभविष्य - 18 मार्च 2026

अग्रलेख : धर्मस्वातंत्र्याचे तारतम्य

SCROLL FOR NEXT