Almatti Dam Karnataka esakal
पश्चिम महाराष्ट्र

कर्नाटक-महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या 'आलमट्टी'तून किती लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग? कोल्हापूर, सांगलीला पुराचा धोका?

महाराष्ट्रातील जलाशयांतून येणारे पाणी व पावसाच्या पाण्याची आवक प्रचंड वाढत आहे. सध्या कृष्णेत पाणी वाढत आहे.

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्रातील धरण क्षेत्रात दमदार पाऊस पडत आहे. याबरोबर चिक्कोडी विभाग व कोल्हापूर आणि सांगलीतही अधिक पाऊस असल्याने हे पाणी विविध नद्यांतून कृष्णेत मिसळत आहे.

चिक्कोडी : कर्नाटक-महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या आलमट्टी (Almatti Dam) जलाशयातून शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजता ३ लाख क्युसेक विसर्ग करण्यात येत आहे. सध्या जलाशयात दोन लाख दहा हजार क्युसेक पाणी वाहून येत आहे.

महाराष्ट्रातील जलाशयांतून येणारे पाणी व पावसाच्या पाण्याची आवक प्रचंड वाढत आहे. सध्या कृष्णेत पाणी वाढत आहे. त्यामुळे आणखी पाणी कृष्णेतून (Krishna River) आलमट्टीत वाढणार आहे. त्यासाठी महाराष्ट्रातून विनंती आणि पाण्याची आवक पाहून आलमट्टीतून विसर्ग वाढविण्यात आला आहे.

गुरुवारी (ता. २५) दुपारी पावणे तीन लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. प्रत्यक्षात कालच तीन लाख विसर्ग करण्याचे नियोजन होते; पण रात्री उशिरापर्यंत आदेश प्राप्त झाला नसल्याने शुक्रवारी (ता. २६) दुपारी दोन लाख ९० हजार व संध्याकाळी सहा वाजता आणखी दहा हजार वाढवून एकूण तीन लाख क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील धरण क्षेत्रात दमदार पाऊस पडत आहे. याबरोबर चिक्कोडी विभाग व कोल्हापूर आणि सांगलीतही अधिक पाऊस असल्याने हे पाणी विविध नद्यांतून कृष्णेत मिसळत आहे. त्यामुळे कृष्णेचा पूर टाळण्यासाठी आलमट्टीतून विसर्ग वाढविण्यात येत आहे. शुक्रवारी कृष्णा नदीतून आलमट्टीत जाणाऱ्या पाण्यातही वाढ झाली आहे. सध्या धरणात ८०.६० टीएमसी पाणीसाठा (६५.४९ टक्के) झाला आहे.

Almatti Dam

विसर्ग वाढविण्यात आल्याने रोज धरणातील साठा कमी होत आहे. आठवड्यापूर्वी शंभर टीएमसी भरलेले धरण आता ८० टीएमसीवर आले आहे. आतापर्यंतचा हा सर्वाधिक विसर्ग असल्याचे सांगण्यात आले. आलमट्टीतून विसर्ग वाढवून कर्नाटक व महाराष्ट्र या दोन्ही राज्यांकडून पूरस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : कर्नाटकातील 'मंगळूर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड'मध्ये अचानक भीषण आग

कसाबच्या भूमिकेत ललित प्रभाकरला पाहून येईल चीड; राजकुमार रावही जबरदस्त, 'प्रहार' चा ट्रेलर बनला चर्चेचा विषय

Alegaon Paga Murum Scam: आलेगाव पागा पाझर तलावातील कथित अवैध मुरूम उत्खननाचा ‘खरा हिशोब’ किती? पर्यावरणप्रेमींची वरिष्ठ चौकशी व फेरपंचनाम्याची मागणी

Sillod Farmer: पीक कर्ज, पाण्याअभावी वाळलेले पीक; सिल्लोड तालुक्यात ३० वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्याने जीवन संपवले

Maharashtra NCC Crisis: राज्य सरकारच्या लालफीतशाहीमुळे एनसीसी विस्ताराला ब्रेक; दीड लाख छात्रांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण अकादमीचा अभाव, ४०-६० टक्के पदे रिक्त

SCROLL FOR NEXT