How much of a blow to Koran's poultry business 
पश्चिम महाराष्ट्र

कोरोनाचा पोल्ट्रीला नेमका किती फटका, माहिती मागवली

सकाळ वृत्तसेवा

नगर ः कोरोन विषाणूच्या अफवेमुळे कुकुट व्यवसायिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. या नुकसानीचा आढावा घेण्याच्या सूचना अर्थ व पशुसंवर्धन समितीचे सभापती सुनील गडाख यांनी आज दिल्या. 
पशुसंवर्धन समितीची सभा गडाख यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी या सचूना त्यांनी दिल्या. या सभेला सदस्य संध्या आठरे, सोनाली रोहमारे, शांता खैरे, दिनेश बर्डे, वंदना लोखंडे, सचिव डॉ. सुनील तुंबारे उपसिथत होते. कोरोनाच्या अफवेमुळे कुकुट व्यवसायिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. या नुकसानग्रस्त व्यवसायिकांना दिलासा देण्यासाठी तसेच त्यांचे झालेले आर्थिक नुकसानीची भरपाई देण्यासाठी आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.

या नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत मिळून देण्यासाठी आपण मंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्फत पशुसंवर्धन मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करू असेही या वेळी सांगितले. 
पंतप्रधान किसान योजनेचे विस्तारीकरण करण्यात आलेले असून आतापर्यंत शेतकऱ्यांना फक्‍त कृषी कर्ज देण्यात येत होते. त्याची मर्यादा ही एक लाख 40 हजार इतकी होती.

या योजनेची कर्ज मर्यादा आता तीन लाख इतकी झालेली आहे. विस्तारीत योजनेत दुग्धव्यवसाय, शेळी-मेंढी पालन कुकुट व्यवसाय, गोठा बांधकामासाठी अर्थ सहाय्य या योजनेअंतर्गत देण्यात येत आहे. या योजनेंतर्गत कमीत कमी सात टक्के दराने कर्ज उपलब्ध होणार आहे.

नियमित कर्जाची परतफेड केल्यास फक्त चार टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध होणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी नावे पंतप्रधान किसान योजनेत आहेत. त्यांना प्राधान्याने या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT