peacock.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

वाह...किती छान.. येथील बनात थुईथुई नाचतोय मोर 

सकाळवृत्तसेवा

अंकलखोप (सांगली)-  बुर्ली (ता. पलूस) येथे वळीवानंतर पहाटे बंचाप्पा बनी मोर नाचू लागला आहे. मराठीत अनेकांना तोंडपाठ असणाऱ्या "नाच रे मोरा, आंब्याच्या बनात, नाच रे मोरा नाच' या गीताप्रमाणे हा मोर आंब्याच्या बनात नाही तर विविध प्रकारच्या वृक्षांनी तयार झालेल्या बंचाप्पा बनात नाचत आहे. त्याचा केकारव सध्या बंचाप्पा बनात घुमत आहे. 


वळीवाच्या पावसानं "कोरोना' लॉकडाऊन, उकाड्याने हैराण जनतेला दिलासा तर दिलाच. त्याचबरोबर मोरांना त्यांच्या विणीच्या हंगामाची आठवण करून दिली. पावसाच्या सुरुवातीला मोरांच्या विणीचा हंगाम असतो. साधारणपणे मे महिन्यापासून ते जून अखेरीपर्यंत लांबलचक पिसारा असणारे व पिसारा फुलवून नाचणारे मोर बंचाप्पा बनातील झाडीच्या आसपास दिसू लागतात. मोर मादीला आकर्षित करण्यासाठी पिसारा फुलवून नृत्य करीत असतात. 
पाऊस, मोर यांचं नातं वेगळंच असतं. पहाटे वळीवाच्या सरी कोसळून गेल्यानंतर मोर जास्त खुशीत दिसतात. पिसारा फुलवून थुईथुई नाचणारा मोर पाहण्याचा आनंद पावसामुळे मिळत आहे. 

""एकीकडे वैशाख वणव्याने जीवाची काहिली झाली 
असताना माणूस "कोरोना' मुळे बंदिस्त आहे. मामसाच्या अतिक्रमणामुळे पिढ्यानपिढ्या बंदीस्त पक्षीजगत स्वातंत्र्याचा श्वास घेत आहे. पहाटे असंच चित्र बंचाप्पा बनात पहायला मिळत आहे. पिसारा फुलवून मोर नाचू लागलेत. भिजलेल्या पंखांचा पिसारा अधिकच खुलून दिसतो. त्याच्याभोवती घुटमळणारी लांडोर मात्र नृत्यावर अजूनतरी प्रभावित झालेली दिसत नाहीत.'' 

-संदीप नाझरे, पक्षीप्रेमी, आमणापूर 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Satara MLC Result : सांगली-साताऱ्यात जयंत पाटलांना मोठा धक्का! भाजपच्या धैर्यशील कदमांनी शरद पवार गटाचा गेम उलटवला; पाहा किती मतांनी केला पराभव

Maharashtra Legislative Council Results : महायुतीचा विधानपरिषदेत दणदणीत विजय; ११ पैकी १० जागा खिशात, नाशिकमध्ये अपक्ष गितेंनी दिला धक्का

Gold-Silver Price Today : सोने-चांदीच्या दरात एकाच दिवशी प्रचंड उसळी; चांदी तब्बल 4,000 ने महागली, सोन्याचा काय भाव? पाहा तुमच्या शहरातील आजचे ताजे दर

Yashasvi Jaiswal: तंबूत राहणाऱ्या मुलाने वडिलांना दिली 1.32 कोटींची कार; यशस्वी जैस्वालची ही भेट पाहून तुम्हीही भावूक व्हाल!

Latest Marathi News Live Update : हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गावरील पहिला टप्पा जून अखेरपर्यंत पूर्णत्वास

SCROLL FOR NEXT