marrage 
पश्चिम महाराष्ट्र

लग्नाला मंजुरीबाबत प्रचंड गोंधळ

सकाळवृत्तसेवा

सांगली ः कोरोना प्रतिबंधासाठी लागू केलेल्या नियमांच्या काळात 50 लोकांच्या उपस्थितीत लग्नसोहळा पार पाडता येईल, असे स्पष्ट आदेश राज्य शासनाने जारी केले आहेत. जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी स्वतः त्याची जाहीर घोषणा केली आहे.

त्यानंतरही लग्नाच्या मंजुरीबाबत प्रचंड गोंधळाची स्थिती आहे. लग्नासाठी पोलिसांची परवानगी आवश्‍यक आहे का, हेच पोलिसांना माहिती नाही. मंजुरीशिवाय लग्न करावे तर ते पोलिस पाटलांना मान्य नाही, अशा गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.

कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी कोणत्याही स्थिती गर्दी करू नये, असे आदेश आहेत. तेच आदेश लग्न कार्यासाठीही लागू होते. याआधी लग्न करायचे असेल तर बारा ते पंधरा लोकांच्या उपस्थितीत ते करावे, असे म्हटले होते. आता 4 मेपासून 17 मेपर्यंत लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये काही बाबींसाठी नियम शिथिल करण्यात आले आहेत. त्यात लग्नासाठी आता 50 लोकांच्या उपस्थितीला मंजुरी देण्यात आली आहे. तेवढे लोक घेऊन लग्न करता येईल, असे जिल्हाधिकारी चौधरी यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले.


या स्थितीत आता लग्नासाठी पोलिसांची मान्यता आवश्‍यक आहे का, याबाबत कोणतीही स्पष्टता नाही. पोलिसांकडे त्याबाबत चौकशी केली असता त्याबाबत कोणतेही आदेश प्राप्त झाले नसल्याचे सांगण्यात आले.

मान्यता न काढता लग्न सोहळा उरकावा तर पोलिस पाटील आणि तलाठी यांनी मान्यतेबाबत आग्रही भूमिका घेतली आहे. त्यामुळे ज्याच्या घरी लग्नसोहळा आहे, त्यांची चांगलीच धावपळ उडाली आहे. याबाबत काहीएक स्पष्ट आदेश जारी करावेत, अशी मागणी करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

H-1B Visa US Rules : डोनाल्ड ट्रम्प भारतीयांना आणखी एक मोठा झटका देण्याच्या तयारीत; H-1B व्हिसा पूर्णपणे बंद होणार?

Rohit Sharma Video: रोहित टीम बसमधून उतरताना पाय घसरून पडला, पोलिसांसह सारे सावरायला धावले; विराट लांब उभा राहून फक्त...

अभिनेत्री रकुलप्रीत सिंगच्या घरावर आयकर विभागाची छापेमारी; चित्रपटांच्या नावाखाली परदेशात पैसा पाठवत असल्याचा संशय

दुष्काळाच्या झळा! सोलापुरात चारा वाहतुकीवर निर्बंध; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

Latest Marathi News Live Update : पाण्यासाठी शेतकऱ्यांनी ग्रामस्थांचा रास्ता रोको.. पाण्यासाठी मेंढ्याही रस्त्यावर

SCROLL FOR NEXT