ALS20A00653_pr.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

तळपत्या उन्हात  "खाकी'ची माणूसकी 

दिपक पवार

आळसंद (सांगली) जे खळांची व्यकंटी सांडो !, तया सत्कर्मी रती वाढो !! भूता परस्परें जडो ! मैत्र जीवांचे !!दुरितांचे तिमिर जावो ! विश्व स्वधर्मसूर्यें पाहो ! जो जे वांछील तो तें लहो ! प्राणिजात !!  शेकडो वर्षांपूर्वी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी पसायदान लिहिले आहे. त्यात म्हणतात, दुरित म्हणजे पाप, तिमिर म्हणेज अंधार , पापरूपी अंधाराचा नाश होवो. सगळ्या विश्वाने स्वधर्म रुपी सूर्याच्या प्रकाशात पाहावे, मग सर्व प्राण्यांना ज्याला जे हवे असेल ते मिळेल. असे सांगितले आहे. त्याची अनुभूती आळसंद मधील ग्रामस्थांना आली. 

पोलिस कॉनस्टेबल मारूती हजारे, अंकुश लुगडे हे दोघे आळसंद परिसरात पोलिस बंदोबस्तासाठी येत होती. त्यांनी आळसंद मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर थांबल्यानंतर माकडांचा एकच कल्लोळ उडाला. अंकुश लुगडे यांच्या लक्षात तात्काळ लक्षात आले. त्यांनी किराणा मालाच्या दुकानातून बिस्किटे आणली. अन्‌ माकडांना खाऊ घातली. संवेदनशील पोलिस कर्मचाऱ्यांचा प्रत्यय आला. 

कोरोना च्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन पुकारला आहे. जिल्ह्यात संचारबंदी लागू केली आहे. प्रशासकीय यंत्रणेवर याचा ताण येणं साहजिक आहे. अशा बिकट परिस्थिती पोलिसांची चांगलीच तारांबळ उडत आहे. धक्कीच्या व धावपळीच्या जीवनात पोलिस कर्मचाऱ्यांच्याकडून प्राण्यांच्या बाबतीत दाखवलेली संवेदनशील पणा आळसंदकरानी अनुभवला.

खाकीत सुध्दा माणुसकी दडली असल्याचा प्रत्यय आला. माकडांना खाऊ घालतानाचे छायाचित्रे सोशल मीडियावर झाल्यानंतर व्हायरल झाले. मारुती हजारे व अंकुश लुगडे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BEST Bus Accident: बेस्टचा भीषण अपघात! रिव्हर्स घेताच पादचाऱ्याला चिरडलं, नंतर बाईक आणि रिक्षावर आदळली; थरारक घटनेचा Video Viral

Pune: बंधाऱ्याचे ढापे वेळेत न काढल्याने शेताचे नुकसान; मुसळधार पावसामुळे शेत वाहून गेले; नुकसानभरपाईची ग्रामस्थांची मागणी

Latest Marathi News Live Update : पिंपरीत इमारत कोसळली, १४ नागरिक अडकले

Parbhani: खड्ड्यांनी पिळले, चिखलानेही छळले!; शहराअंतर्गत प्रमुख रस्त्यांचीच दुरवस्था; पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

Thane News: ठाण्यातील 'या' मोठ्या ८ शाळा बेकायदा, शिक्षण विभागाची माहिती; अ‍ॅडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांचे काय होणार?

SCROLL FOR NEXT